या निवडणुकीचा अर्थ - हिंदी झालेल्यांना पुन्हा हिंदू करायचे आहे!

Modi 3.0-BJP-Election results ३ टर्म गुजरातवर राज्य

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
यंगिस्तान
 
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results ज्या सचिन तेंडुलकरकडून शतक झळकावण्याची अपेक्षा असते, तो नव्वदवर बाद होतो, तेव्हा प्रचंड दुःख होतं. पण सचिनने शतक झळकावले नाही, तो नव्वद धावा करून बाद झाला म्हणजे तो नापास झाला असा याचा अर्थ होत नाही. सचिनकडून शतक झळकवण्याची अपेक्षा असते. Modi 3.0-BJP-Election results मात्र, खेळात काहीही होऊ शकतं. तसंच निवडणुकीचं आहे. ‘अबकी बार ४०० पार'ची घोषणा मोदींनी दिली. पण प्रत्यक्षात ३०० पार सुद्धा होऊ शकले नाही. मात्र, हा पराभव नाही. इंग्रजी मीडियाने चांगला शब्द वापरला आहे,सेटबॅक! Modi 3.0-BJP-Election results मराठीत पीछेहाट असा अर्थ होतो. भाजपाची पीछेहाट नक्कीच झालेली आहे. त्यामुळे भाजपविश्वामध्ये निराशेचं वातावरण आहे. याचं मुख्य कारण भाजपानेच फुगवलेला अपेक्षांचा फुगा!
 
 

Modi 3.0-BJP-Election results 
 
 
Modi 3.0-BJP-Election results गुजरातपासून मोदी हे चांगल्या मतांनी निवडून येत आहेत. राष्ट्रीय राजकारणातही त्यांची एंट्री दणक्यात झाली. मात्र, मोदींच्या या शेवटच्या टर्ममध्ये (वयानुसार शेवटची टर्म असावी) त्यांना यश मिळवताना संघर्ष करावा लागला. आता मोदींना सत्ता राबवता येईल की नाही? महत्त्वाचे निर्णय घेता येतील की नाही? चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी दोन अडीच वर्षांनी पाठींबा काढून घेतला तर काय होईल? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. याचं उत्तर अगदी साधं आहे, मोदींनी ३ टर्म गुजरातवर राज्य केलं, आता तिसऱ्यांदा ते पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नक्कीच तयार आहेत.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results आता राहिला प्रश्न या निवडणुकीतून काय शिकायला हवं? आपण अशा देशात राहतो, ज्या देशात आयुर्वेदाचा जन्म झाला. आयुर्वेदात कोणत्याही आजारावर उपचार करताना त्याच्या मुळापर्यंत जाण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना नेमकी समस्या काय आहे, हे मुळातून समजून घ्यावं लागेल. काँग्रेसची स्थापना होण्याआधी हा देश राम-कृष्ण-छत्रपती शिवराय यांच्या तत्त्वांवर चालत होता. मात्र, काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी एक शपथ घेण्यात आली, हिंदूंनी आपलं हिंदूपण विसरून जावं, मुस्लिमांनी आपलं मुस्लिमपण विसरून जावं. आपण एक नवं आधुनिक राष्ट्र घडवूया. त्याला आपण हिंदी राष्ट्र म्हणू... काँग्रेसने हिंदू राष्ट्रवाद नाकारला आणि हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला. त्यांना यातही अपयश आलं. ते मुस्लिम समाजाला हिंदी करू शकले नाहीत. हिंदू मात्र मोठ्या संख्येने हिंदी झाले.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results हिंदू क्रांतिकारक आपल्या जीवाचं रान करत असताना, मुस्लिम समाजाने स्वातंत्र्य युद्धाला पाठींबा देण्यासाठी अट ठेवली. खिलाफत चळवळीला पाठींबा दिला, तर आम्ही काँग्रेसला देश स्वतंत्र करण्याच्या लढाईत पाठींबा देऊ. काँग्रेसने खिलाफतीला पाठींबा दिला. त्याचे भीषण परिणाम हिंदूंना भोगावे लागले. मोपल्यांनी बंड केला आणि हिंदूंच्या कत्तली करण्यात आल्या, महिलांवर बलात्कार झाले. तरी देखील पुढे पाकिस्तानची मागणी होऊ लागली. सुरुवातीला काँग्रेसने पाकिस्तान होणार नाही, अशी बनवाबनवी केली आणि अखेर पाकिस्तानला मान्यता देऊन फाळणी झालीच. स्वा. सावरकरांनी हिंदूंना सावध केलं होतं की, काँग्रेस तुम्हाला फसवेल आणि फाळणी करेल. पण हिंदूंनी सावरकरांचं ऐकलं नाही. त्याचे परिणाम आजही हिंदूंना भोगावे लागत आहेत. तरी देखील हिंदू पूर्णपणे एकत्र आलेले नाहीत.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results मुस्लिम लीगने डायरेक्ट अ‍ॅक्शन बंगालमध्ये केली होती. म्हणजे ज्या बंगालमध्ये सर्वाधिक अत्याचार झाले, त्या बंगालमध्ये कधीही हिंदूंची सत्ता आली नाही. ज्या केरळमध्ये मोपल्यांनी हाहाकार माजवला ते राज्य कम्युनिस्ट पक्षाच्या अंमलाखाली आहे. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसने १०५ हुतात्म्यांना गोळ्या घालून जीव घेतला, ती काँग्रेस महाराष्ट्रावर राज्य करत राहिली. ही आपली शोकांतिका आहे. हे हिंदूंचे दुर्गुण आहेत आणि हे दुर्गुण आपण स्वीकारले पाहिजे व त्यानुसार पुढील कार्य केले पाहिजे. आता हळूहळू प्रदेशानुसार आकडे समोर येत आहेत आणि ते आकडे व्होट जिहादकडे झुकणारे आहेत. मुसलमान समाजाने मोदींना हरवण्यासाठी मतदान केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर अशा महान नेत्यांनी भारताचे भावविश्व हिंदू राहावे, यासाठी कठोर कष्ट घेतले.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results मोदी हे सावरकर भक्त आणि शिवाजी महाराजांचे वैचारिक मावळे असल्यामुळे त्यांचाही तोच प्रयत्न आहे. भारताचे भावविश्व हिंदू राहावे. पण मुस्लिम समाजाची जडणघडण वेगळी झाल्यामुळे त्यांना भारताचे भावविश्व हिंदू नकोय. ही सवय त्यांना खिलाफतीला पाठींबा देऊन काँग्रेसने लावली. आजही देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे म्हणणारे काँग्रेस नेते आहेत. यालाच मुस्लिम मतदार बळी पडले आणि त्यांनी मोदींच्या विरोधात एकगठ्ठा मतदान केले. काँग्रेसने मुस्लिमांचा फक्त राजकारणासाठी फायदा उचलला, पण मोदी मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात आणू पाहत आहेत. त्यांनी अनेक सुविधा दिल्या आहेत. तरी देखील ते मोदींच्या विरोधात मतदानासाठी उतरले. कारण त्यांना घाबरवून ठेवले आहे की मोदी सीएए, एनआरसीच्या माध्यमातून मुस्लिमांना त्रास देतील.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results दुसरी गोष्ट हिंदू जिद्दीने मतदानासाठी उतरले नाहीत आणि बहुसंख्य हिंदू हिंदुत्वासाठी मतदान करत नाहीत. तरी देखील मी असे म्हणेन की भाजपाला २४० जागा मिळाल्या त्या हिंदूंच्या बळावर. मी आपल्या यंगिस्तान स्तंभामध्ये ‘अबकी बार मोदी का हिंदू परिवार' या मथळ्याचा लेख लिहिला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की, काँग्रेसने मुस्लिमांना व्होट जिहाद करायला सांगितलं, तर हिंदूदेखील भगवा व्होट करतील. जरी सगळेच हिंदू हे हिंदू म्हणून एकगठ्ठा मतदान करत नसले तरी यावेळी हिंदूंनी मोदींना पंतप्रधानपदावर बसवायचंच, असं ठरवलं होतं. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जागा कमी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा आपली हिंदू व्होट बँक तयार झाली आहे याचा आनंद मानत जे नाराज हिंदू मतदार आहेत, त्यांना आपल्याकडे कसं वळवता येईल, यावर विचार करायला हवा. ४ जून रोजी जेव्हा निकाल स्पष्ट होत होता, तेव्हा मी देखील थोड्या वेळासाठी अस्वस्थ झालो होतो. तेव्हा मी ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांना फोन केला आणि हा इतका बदल कसा काय घडला असेल, याबाबत विचारणा केली.
 
 
 
Modi 3.0-BJP-Election results त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्यापैकी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याविषयी मी या लेखात वर चर्चा केलीच आहे, काँग्रेसची पृष्ठभूमी सांगितलीच आहे. त्या अनुषंगाने अरविंद कुळकर्णी म्हणाले, जे अजूनही हिंदी आहेत, त्यांना हिंदू करायचे आहे. म्हणजे काय तर सपशेल फेल ठरलेल्या काँग्रेसच्या खोट्या हिंदी राष्ट्रवादाचा पर्दाफाश करून, हिंदी झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदुत्वाकडे वळवायचे आहे. जेणेकरून प्रत्येक हिंदू हा हिंदू म्हणून मतदान करेल. त्यांच्या हिंदू म्हणून मागण्या असतील. अशा अनेक निवडणुका येणार आहेत. कधी जय तर कधी पराभवाचा सामना करावा लागणार आहे. पण आपलं मूळ ध्येय हे केवळ निवडणुका जिंकणं नसून भारताचं भावविश्व हिंदू राहील यासाठी प्रयत्न करणे, असे आहे. हिंदी झालेला शेवटचा हिंदू पुन्हा हिंदू होत नाही तोपर्यंत कार्य करत राहायचं आहे. बाकी प्रभू श्रीरामांची इच्छा!