फोटोपुरते मर्यादित झाले वृक्षारोपण!

plantation drive वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
वेध
 
 
- अनिल फेकरीकर
plantation drive ‘लावा वृक्ष मिळवा मोक्ष,' असे भाषणांमधून सांगणारे शंभर सापडतील. पण प्रत्यक्षात एक झाड लावल्यानंतर ते जगविणारे शोधूनही सापडत नाहीत. असे का? याचे उत्तर शोधण्याची वेळ आलेली आहे. कारण, पावसाळा येताच वृक्षारोपणाचे कार्यक्रम वाढणार आहेत. plantation drive याअनुषंगाने मान्यवर फोटो काढतील आणि वृक्षारोपण केल्याचे गावभर सांगतील. पण पुढच्या वर्षी त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या जागेवर गेल्यावर काहीही आढळून येणार नाही. अर्थात गेल्या काही वर्षांत फोटोपुरतेच वृक्षारोपण मर्यादित झाले आहे. याच कारणाने पृथ्वी हिरवीगार होण्याऐवजी सिमेंटच्या जंगलाने व्यापली आहे. plantation drive त्याचे परिणाम अवकाळी पावसाच्या रूपाने सर्वांनाच भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण काहीतरी करायला हवे, या भावनेतून प्रत्येकाने वृक्षलागवडीसह त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नपूर्वक कार्य करणे आवश्यक झाले आहे.
 
 
 
plantation drive
 
 
 
संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे सांगत झाडांचे महत्त्व कथन केले आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. त्याच वर्गाने तुकाराम महाराजांवरील श्रद्धेपोटी एक झाड घरोघरी लावण्यासाठी पुढे येऊन नवा आदर्श स्थापन करायला हवा. plantation drive भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी नागपुरात घरोघरी संत्र्याची झाडे लावावी, असे म्हटले आहे. कल्पना खरोखरच सुंदर आणि लाभदायक आहे. गावात रस्त्याच्या दुतर्फा खूप जागा असते. या जागेचा वापर योग्य पद्धतीने न झाल्याने अतिक्रमण वाढत आहे. महाराष्ट्रात एकूण २८,८१३ ग्रामपंचायती आहेत, तर त्याअंतर्गत सुमारे ४४ हजार गावे आहेत. प्रत्येक गावात ५०० झाडे लावायची आणि जगवायची हा हिशेब केला तर सुमारे २ कोटी २० लाख वृक्ष जगतील. ती झाडे समजा फळांची राहिली तर भविष्यात त्या माध्यमातून पोषक आहार गावकऱ्यांना मिळेल. plantation drive पूर्वी नाही का घरोघरी परसबाग राहायची. आजही रामटेक तालुक्यातील देवलापार, पवनी, वडंबासारख्या आदिवासी गावांमध्ये परसबाग ही संकल्पना नेटाने राबविली जात आहे. यामुळे आदिवासी कुटुंबांना पपई, आंबा, फणस, पेरू, चिकू, सीताफळ, डाळींब, काकड्या, गाजर आणि इतर भाजीपाला सहजतेने खायला मिळतो.
 
 
 
त्यामुळे पैसाही वाचतो आणि पौष्टिक आहार मिळाल्याने आरोग्यही सुदृढ राहते. पूर्वी जंगलात फळांची झाडे राहायची. कालांतराने त्यांची बेसुमार कत्तल झाली. मग काय जी जागा मोकळी दिसायची, त्यावर वनविभागाने माणसाच्या आणि वन्यप्राण्यांच्या उपयोगी पडणार नाही, अशी झाडे लावली. plantation drive परिणामी तृणभक्षी वन्यप्राण्यांची उपासमार सुरू झाली. त्यांनी जंगलांकडून शेतांकडे पलायन सुरू केले. आता तर त्यांना जंगलापेक्षा शेतातच अधिक मजा येते. तिकडे तृणभक्षी शेतात मुक्कामी यायला लागल्याने त्यापाठोपाठ बिबट, वाघोबाही शेतांकडेच रमले आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. याचाही विचार करता गावागावांत वृक्षारोपणाची मोहीम युद्धपातळीवर आणि कटाक्षाने राबविण्याची गरज आहे. मरता क्या नहीं करता, अशीच स्थिती आज आहे. plantation drive कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व मरणाऱ्यांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना कळले. त्याही लोकांनी वृक्षारोपणासाठी सक्रिय क्रियाशील होणे अगत्याचे आहे. पूर्वी गावात आमराई राहायच्या. पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक कृती करून पुढील पिढीला गोड, रसाळ आंबे खायला मिळावेत म्हणून परिश्रम घेतले होते.
 
 
 
plantation drive त्याचे लाभ अनेक पिढ्यांनी घेतले. आता त्या आमराई नामशेष झाल्या आहेत. त्यावर लोकांनी अतिक्रमण करून घरकुले उभारली आहेत. गावखेड्यांत गरज नसलेली मंडळीही शासनाकडून फुकटात भेटते ना मग बांध घरकूल, असे करीत सिमेंटचे जंगल वाढविण्यावर भर देत आहे. हा सर्व प्रकार पाहता यावर फळझाडांची लागवड हा उपाय रामबाण ठरू शकतो. फळांची झाडे लावल्याने वानरांच्या टोळ्या शेतात जाणार नाहीत. त्यांना जंगलात आणि रस्त्यांवरील फळझाडांकडून पोषक आहार मिळेल. ती तिथेच तृप्त होतील अन् शेताचा रस्ता विसरतील. plantation drive यातूनच शेतातील पिकांचे अप्रत्यक्ष संरक्षण होईल. जंगलातील फळझाडे संपल्याने काय होते, हे पाहायचे असेल तर नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी गावात जा. तिथे वानरांच्या टोळ्या गावात आल्याने एपीएल शेतकरी बीपीएल झाले आहेत. म्हणूनच सांगतो, वृक्षारोपण केल्यावर फोटो काढून त्याची बातमी छापून घेण्यापेक्षा आम्ही जगविलेल्या झाडांची फळे खा अन् आरोग्य सुदृढ ठेवा, असा नारा देण्याची वेळ आलेली आहे.
 
९८८१७१७८५९