घरातून तीन लाखांची चोरी

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
रिसोड, 
हळदीची विक्री theft detection केल्यानंतर शेतीसाठी ठेवलेली ३ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना ६ जून रोजी मध्यरात्री रिसोड तालुयातील सवड येथे घडली. या घटनेनंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सवड येथील शेतकरी प्रकाश नामदेव मस्के यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ६ जून रोजी रात्री गावात वीजपुरवठा नव्हता. घरातील सर्वजण एकाच खोलीत झोपले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात मुख्य दरवाजातून प्रवेश करून कपाटात ठेवलेली ३ लाखांची रोकड चोरून नेल्याचे प्रकाश मस्के यांनी सांगीतले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
 

dfsdf 
 
रिसेाड तालुक्यासह जिल्ह्यात theft detection गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यात वीज वितरण कंपनीकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चोरटे याचा फायदा घेत आहेत. रिसोड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मात्र, यातील चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप होत आहे.