बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांच्या गर्दीने बाजार फुलला

09 Jun 2024 16:24:59
- कपाशीच्या वाणाचा तुटवडा, चढ्या दराने होतेय विक्री 

श्रीक्षेत्र माहूर, 
मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून Capus Biyane बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या गर्दीने माहूर येथील परवानाधारक कृषी सेवा केंद्र फुललेली आहेत. परंतु जिल्ह्याच्या वितरकाकडून कपाशीच्या काही वाणाचा पुरवठा होत नसल्याने 864 रुपयाची पिशवी दोन हजार रुपयापेक्षा अधिक दराने विकली जात असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
 
 
kapus biyane
 
Capus Biyane  : यंदाच्या खरीप हंगामासाठी कबड्डी, राशी 659, प्रदीप बिजी 2, यूएस 7067, सुपर कॉट, पंगा, एएक्स बिजी 2, अजित 155 व संकेत आदी कपाशीच्या वाणाला शेतकर्‍यांतून मोठी मागणी आहे. परंतु जिल्ह्याच्या वितरकाकडून या वाणाचा पुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांच्या या दुकानातून त्या दुकानात अशा फेर्‍या सुरू आहेत. काही वाणाचा तुटवडा झाल्याने अधिक दराने विक्री सुरू असलेला हा तुटवडा ‘कृत्रिम की नैसर्गिक’ याचा शोध घेण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. शेतकर्‍यांनी एकाच प्रकारच्या वाणाचा आग्रह धरू नये. बियाणे उपलब्ध असूनही दुकानदार ते देण्यास नकार देत असल्यास नजीकच्या कृषी सहायक, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0