देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदावरून काढली राकाँच्या नेत्यांची समजूत

    दिनांक :09-Jun-2024
Total Views |
- सुनील तटकरेंच्या घरी बैठक
 
नवी दिल्ली, 
शपथविधीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्या राजधानी दिल्ली येथील निवासस्थानी रविवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी राकाँ नेत्यांची समजूत घातल्याची माहिती आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नसल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस हे तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
 
 
Devendra Fadnavis
 
मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपाने निश्चित केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत मित्रपक्षाला मिळालेल्या खासदाराच्या संख्येनुसार मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. सुनील तटकरे हे एकमेव खासदार राकाँकडून निवडून आले. तरीही भाजपाने सुनील तटकरे यांना मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पटेल यांना मंत्रिपद देण्याची अट ठेवल्याने राकाँचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तटकरे यांच्या निवासस्थानी नेत्यांची खलबते झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी Devendra Fadnavis फडणवीस यांनी नेत्यांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात भाजपा व राकाँकडून प्रतिकि‘या देण्यात आली नव्हती.