वडनेर,
Hinganghat - fertilizer for seeds हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी मशागतीचे सर्व कामे आटोपून शेतीचा संसार फुलवण्यासाठी मग्न आहे. परंतु, येथील हिंगणघाट तालुक्यातील कृषी अधिकारी यांचे शेतकरी विरोधी धरण हे कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांमध्ये आहे. शेतकर्यांना बी बियाणे तसेच लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे. शेतकरी रासायनिक खते आणि बी बियाणे खरेदीसाठी गेले असता त्यांना दुसरे बोगस खते घ्यावी लागतात. शासनाचे धोरण शेतकर्यांच्या बांधावर खते पुरविण्याचे असले तरी इथे मात्र कोणतेही खत मिळत नाही. तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांचे दुर्लक्ष आहे. तालुका कृषी अधिकारांच्या अभयामुळे ही शेतकर्यांची अडचण ठरत आहे.
Hinganghat - fertilizer for seeds सध्या शेतकरी वर्ग मशागतीचे कामे शेतीचा संसार कसा फुलवावा या प्रतीक्षेत असताना तालुक्यातील शेतकर्यांना रासायनिक खते आणि बी बियाणे मिळवण्यासाठी मोठी अडचण होत आहे. खते बी-बियाणे रासायनिक खते मिळवण्यासाठी कृषी केंद्र संचालक विद्राव्य खते किंवा इतर खते घेतल्याशिवाय रासायनिक खते बी बियाणे देत नाही. तर बियाण्यांच्या बाबतींत लिंकिंग करीत आहे. गेल्या वर्षी खतांचा काळाबाजार होत नव्हता. परंतु, हिंगणघाट येथे नव्याने रूजू झालेल्या तालुका कृषी अधिकार्यांमुळे ही अडचण हिंगणघाट तालुक्यात निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. बियाण्यांचा काळाबाजार रासायनिक खते शेतकर्यांना मिळत नाही. रासायनिक खताबरोबर कृषी केंद्र संचालन कृषी केंद्र संचालने कृषी अधिकार्याच्या आशीर्वादाने पिल्लू नावाचे योजना आखली आहे. हे पिल्लू घेतल्याशिवाय शेतकर्यांना खते अथवा बियाणे मिळत नाही.