100 दिवसांच्या कृती कार्यक‘माच्या अंमलबजावणीसाठी काम करा

    दिनांक :09-Jun-2024
Total Views |
- नवनियुक्त मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 
देशाचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार आहे, पण त्याआधी आपल्याला 100 दिवसांच्या रोड मॅपवर काम करायचे असल्याचे प्रतिपादन PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. रालोआ सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळात पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या आधी आपल्या निवासस्थानी नवनियुक्त मंत्र्यांच्या बैठकीला मोदी संबोधित करीत होते. मंत्रिमंडळात ज्यांचा समावेश केला जाणार आहे, अशा सर्व मंत्र्यांना मोदींनी आज ‘चाय पे चर्चा’ कार्यक‘मासाठी बोलावले. यावेळी राजनाथसिंह, नितीन गडकरी, अमित शाह, निर्मला सीतारामन्, एस. जयशंकर, धर्मेद्र प्रधान, पीयूष गोयल, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर यांच्यासह दोन डझन मंत्री उपस्थित होते.
 
 
modi 2
 
PM Modi : 100 दिवसांच्या कृती कार्यक‘माची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे, त्याचप्रमाणे काही प्रलंबित योजनांनाही गती द्यायची आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, तुम्हाला जे खाते मिळेल, त्यानुसार या योजनेवर काम करायचे आहे. देशाच्या विकासाचा पाच वर्षांचा जो आराखडा तयार करण्यात आला, त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वांना समर्पित होऊन काम करायचे आहे, असे स्पष्ट करीत मोदी म्हणाले, 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारताचे उद्दिष्ट गाठायचे आहे, रालोआ सरकारचे ते मोठे लक्ष्य आहे. देशातील जनतेचा रालोआवर भरोसा आहे, तो आपल्याला आणखी दृढ कराचा आहे. 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला सर्बांनंद सोनोवाल, चिराग पासवान, ज्योतिरादित्य शिंदे, राव इंद्रजितसिंह, कृष्णपालसिंह गुर्जर, जितीनप्रसाद, किरेन रिजिजू, अन्नपूर्णा देवी, भागिरथ चौधरी, अजय टम्टा, हर्ष मल्होत्रा, जितनराम मांझी, एच. डी. कुमारस्वामी प्रभृती मंत्री उपस्थित होते.