साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :09-Jun-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
rashibhavishy
 
 
मेष (Aries) : परिश्रमाचे चीज होणार
Weekly Horoscope  : या आठवड्यातील आपले ग्रहमान बरेचसे गतिमान स्वरूपाचे आहे. आपल्या आजूबाजूस मोठ्या वेगवान घडामोडी या काळात घडू शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल घटनाक्रम अनुभवास येईल. अडलेली कामे वेग घेतील. काहींना नवे मार्ग सापडू शकतील. आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होण्याचा हा काळ आहे. नोकरी-व्यवसायाच्या दिशेने प्रयत्न करीत असलेल्या युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण होताना दिसू लागतील. मात्र आपले परिश्रम कुठेही कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
शुभ दिनांक- 10, 11, 12, 13
 
 
 
वृषभ (Taurus) : कार्यक्षेत्रात मनाजोगे यश
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान आपल्या पदरी मनाजोगे यश व उत्तम योगांचे दान घालू शकतील असे दिसते. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटू शकेल. आपल्या बोलण्याने, वर्तनाने, कर्तृत्वाने आपण सार्‍यांची मने जिंकू शकाल. अधिकारी वर्गाची मर्जी व सहकार्‍यांची मदत प्राप्त होऊ शकेल. आपल्या काही महत्त्वाच्या योजना सहजी लोकांना पटवून देऊ शकाल. त्यामुळे याचा लाभ आपणास आपल्या कार्यस्थळी अवश्य मिळेल. त्याचा परिपाक म्हणजे आपल्याला दीर्घकालीन लाभाच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. अडचणीचे प्रसंग सहज बाजूला सारता येतील.
शुभ दिनांक- 12, 13, 14, 15
 
 
मिथुन (Gemini) : अपेक्षित घडामोडी घडतील
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपण अगोदर घेतलेले वारेमाप परिश्रम आता कामी येणार असून काही चांगले यश पदरी पडणार आहे. मध्यंतरी जाणवणार्‍या अडचणींमधून आता मार्ग निघेल. नोकरी, व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित घडामोडी घडू शकतील. व्यवसायात मोठे करार-मदार होऊन त्याचे दूरगामी फायदे मिळावेत. शेअर बाजार, वायदे बाजाराशी संलग्न असलेल्या व्यक्तींना काही मोठ्या उलाढाली यशस्वीपणे करता येऊ शकतील. काही शुभ योगांमुळे या सार्‍या घडामोडींना आकर्षकतेचे व समारंभाचे स्वरूप देऊ शकतो.
शुभ दिनांक- 10, 11, 14, 15
 
 
कर्क (Cancer) : मानसिक संभ्रम संभव
सध्याची ग्रहस्थिती आपल्या मानसिक संभ्रमाच्या स्थितीचे द्योतक ठरू शकते, असे प्राप्त योगांवरून दिसते. विशेषतः या आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास हे अनुभव येऊ शकतात. हे करू की ते करू अशा गोंधळात आपण असू शकता. काहींच्या बाबतीत आर्थिक तडजोडीतून ही स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता असूू शकते. त्यामुळे आपण कुणाच्याही भानगडीत न पडता आपण बरे व आपले काम बरे असे धोरण अंगीकारले पाहिजे. काही निर्णय ठामपणे घेऊन तडीस नेले पाहिजेत. बलवान ग्रहांच्या शुभदृष्टीमुळे नोकरी-व्यवसायात आपल्या योजनांना यश प्रदान करेल.
शुभ दिनांक- 9, 11, 12, 13
 
 
सिंह (Leo) : यशाने आत्मिक समाधान
Weekly Horoscope : आपल्या योजना व विचाराधीन कामे यशस्वीपणे पूर्ण करण्याचे बळ आपणास या आठवड्यात निश्चितपणे मिळेल, असे ग्रहमान आपल्याला या सप्ताहाच्या प्रारंभी प्राप्त झालेले दिसते. यशाच्या या वाटेवरूनच आपण पुढील योजनांकडे मार्गक्रमण करू शकाल. काही गोष्टी अतिशय अचानक व अल्पावधीत घडून येताना दिसू शकतील. आपला राशिस्वामी रविच हे सारे घडवून आणेल. व्यवसायात मोठे करार वा विस्ताराच्या योजना अंमलात आणता येतील. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच काही उत्तम आर्थिक आवक घडून येऊ शकतील. कार्यपूर्तीचे आत्मिक समाधान मिळेल.
शुभ दिनांक- 12, 13, 14, 15
 
 
कन्या (Virgo) : गरजांचा प्राधान्यक्रम बदलेल
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान हे आपल्या विशेषतः सामाजिक, आर्थिक तसेच व्यावसायिक प्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचू न देण्याची काळजी घेणार आहेत, असे दिसते. आणि हे टिकवण्यासाठी सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपणास स्वतःच्या धोरणात, व्यवहारात वारंवार, परिस्थितीनुरूप बदल करावा लागू शकतो. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम देखील बदलावा लागेल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे गंभीर आजारपण उद्भवून त्यात आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडू शकतात. त्यामुळे या आठवड्यात तरी आपल्या संयमाचा, सबुरीचा कस लागू शकतो.
शुभ दिनांक- 10, 11, 12, 13
 
 
तूळ (Libra) : उत्पन्नवाढीचे यशस्वी प्रयत्न
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला व्यावसायिक यशाची खात्री बाळगता येईल, असे ग्रहमान सप्ताहाच्या आरंभी प्राप्त झाले आहे. नोकरी किंवा व्यवसायात असलेल्यांना काही मंडळींना एखादा जोडधंदा सुरू करण्याचीही प्रेरणा या काळात होऊ शकते. तसा निर्णय घेणे आपल्यासाठी योग्य ठरणार असून त्यातून लक्षणीय यश मिळू शकेल. थोडक्यात उत्पन्नवाढीचे आपले प्रयत्न यशस्वी ठरतील. कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकिंग, दलाली अशा कामात असणार्‍यांना हा सप्ताह व्यवसाय व उत्पन्नवाढ दर्शवीत आहे.
शुभ दिनांक- 9, 11, 13, 15.
 
 
वृश्चिक (Scorpio) : अनाठायी खर्च आवरा
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान आपणास नोकरी-व्यवसायात आर्थिक मजबुती प्रदान करणारे ठरू शकते. विशेषतः कारखाने, यंत्रसामग्री व जमिनींच्या व्यवहारामध्ये असणार्‍यांना याचा चांगला अनुभव मिळावा. व्यवसायातील यशामुळे आर्थिक आवक उत्तम असली तरी आपणास अनाठायी खर्च करण्यास देखील हे ग्रहमान भाग पाडू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. हौस, मौज, मनोरंजन, व्यसने यावर मोठा खर्च होऊ शकतो. या काळातील एखादी गुंतवणूक फसवी ठरून पैसा अडकून राहू शकतो, त्यामुळे सावध व्यवहार करावयास हवे.
शुभ दिनांक- 9, 12, 13, 15
 
 
धनु (Sagittarius) : जीवनमान सुधारण्यास मदत
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान हे आपली सध्याची परिस्थिती सुधारण्यास हातभार लावणारे आहे. त्यामुळे आपले जीवनमान, व्यावसायिक दर्जा सुधारण्यास मदत मिळेल. आपली अडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. मनाला आनंद देणार्‍या बातम्या मिळतील. काही शुभ व मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. त्यामुळे नव्याने हुरूप येईल. मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीच्या, उच्च शिक्षणाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. काहींना विदेशात जाण्याच्या दृष्टीने हालचाल होताना दिसेल. आपले प्रयत्न कमी पडू नयेत. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक- 10, 11, 14, 15
 
 
मकर (Capricorn) : आर्थिक अडचणी व विलंब
संमिश्र ग्रहमानात सुरू होणारा हा आठवडा या राशीच्या मंडळींसाठी काहीशा तात्कालिक आर्थिक अडचणी व कार्यारंभात विलंब निर्माण करणारा ठरू शकतो. निघत्या साडेसातीतील सध्याची शनिची स्थिती या सप्ताहात आपणास आरोग्याच्या दृष्टीने फारशी हितावह नाही. तो आपणास शारीरिक दुखापतीेंपासून जपण्याचा इशारा देत आहे. या काळात वाहने सांभाळून चालवावयास हवीत. युवा वर्गाला कोणतेही धाडस, प्रयोग अंगलट येऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे. कुटुंबात सामंजस्य राखायला हवे.
शुभ दिनांक- 10, 12, 14, 15
 
 
कुंभ (Aquarius) : मुलांच्या प्रगतीने आनंद
Weekly Horoscope : प्राप्त ग्रहमान पाहता या आठवड्याच्या पूर्वार्धात मन विषण्ण करणार्‍या काही घटना घडताना आपणास दिसू शकतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र विशेषतः मुलांच्या परीक्षांचे निकाल आपणास हर्षित करणारे ठरतील. मुलांची प्रगती पाहून आपले मन आनंदेल. कुटुंबातील वातावरण देखील आनंदी व समाधानाचे होईल. मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी त्या दिशेने प्रयत्न करून पाहावेत. अपेक्षित यश मिळावे. नोकरीच्या वा व्यवसायाच्या प्रयत्नात असणार्‍या युवकांना आगेकूच करता येईल.
शुभ दिनांक- 10, 12, 14, 15
 
 
मीन (Pisces) : समाधान व सहकार्याचे वातावरण
Weekly Horoscope : या राशीच्या मंडळींसाठी या आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनक व मन उद्विग्न करणारी ठरू शकणार असली आणि कुटुंबात काही वादविवाद, मतभेद निर्माण होणार असले तरी सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र सार्‍या अडचणी, वादविवाद, नैराश्य वगैरे संपुष्टात येऊन आनंदाचे, समाधानाचे व सहकार्याचे वातावरण अनुभवू शकाल. कुटुंबाची आवक वाढून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. कुटुंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण करतील. मुलांमध्ये नवा हुरूप संचरताना दिसेल. उच्च शिक्षणाचे बेत आखले जातील.
शुभ दिनांक- 12, 13, 14, 15
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746