कारंजा तालुक्यातील १० हजार ८१३ विद्यार्थ्यांना मिळणार शालेय गणवेश

09 Jun 2024 17:52:04
कारंजा लाड,
school uniform शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शासकीय शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकसमान रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला. या निर्णयाची यंदापासून अंमलबजावणी होणार असून यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जुलै रोजी कारंजा तालुक्यातील १० हजार ८१३ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केल्या जाणार आहे.
 

hjbk 
 
त्यामध्ये १४७ जिल्हा परिषदेच्या व १४ नगरपरिषदेच्या अशा १६१ शाळातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. पात्र असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २४-२५ पासून मोफत गणवेश योजनेच्यामाध्यमातून शासनाच्यावतीने शाळांमध्ये स्थानिक महिला बचतगटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्धकरून दिले जाणार आहे.school uniform या योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग व एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यंदाचे शैक्षणिक सत्र १ जुलैपासून सुरू होणार असल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या १६१ शाळातील इयत्ता पहिली ते आठवीतील १० हजार ८१३ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0