भारत हिंदू राष्ट्र आहे!

Hindu-Amartya Sen-India हिंदू म्हणतील ती पूर्व दिशा!

    दिनांक :01-Jul-2024
Total Views |
कानोसा 
 
- अमोल पुसदकर
Hindu-Amartya Sen-India प्रसिद्ध अर्थशास्त्री व नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी नुकतेच, ते कोलकाता येथे आले असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, भारत हे हिंदू राष्ट्र नाही. भारताला हिंदूराष्ट्र दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. करोडो रुपये खर्च करून राम मंदिर बनविले गेले; हे ठीक झाले नाही, असे ते म्हणाले. Hindu-Amartya Sen-India मोदींच्या कार्यकाळात लोकांना त्यांच्यावर खटले दाखल न करता जेलमध्ये टाकण्यात येत आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या मंत्र्यांना पूर्वीचीच खाती देण्यात आली याबद्दलही खेद व्यक्त करीत भारतामध्ये बेरोजगारी वाढत असल्याचे ते म्हणाले. वास्तविक पाहता अमर्त्य सेन हे अमेरिकेत राहात असतात. Hindu-Amartya Sen-India त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून अमेरिकेमध्ये बेरोजगारी कमी करून दाखविली पाहिजे होती. मोदी सरकारने मागील वेळच्याच मंत्र्यांना तीच खाती दिली, याची चिंता अमेरिकेमध्ये राहणाऱ्या अमर्त्य सेन यांनी करण्याची आवश्यकता नाही. Hindu-Amartya Sen-India ज्या मंत्र्यांनी चांगले काम केले असेल त्यांना मोदीजींनी तेच खाते पुन्हा दिले असेल. यामध्ये चिंता करण्यासारखे काही नाही.
 
 
 
Hindu-Amartya Sen-India
 
 
 
राम मंदिरावर त्यांनी चिन्ता व्यक्त केलेली आहे तर यामध्ये त्यांना सांगितले पाहिजे की, रामाचे मंदिर हे अयोध्येत बांधले गेले आहे. ते रामाच्या जन्मभूमीवर बांधले गेले आहे. Hindu-Amartya Sen-India रामाचे करोडो भक्त या देशात राहतात त्यामुळे ते बांधले गेले आहे. याच मंदिरासाठी गेल्या ५०० वर्षांपासून हिंदू समाजाने संघर्ष केलेला होता. त्यानंतर आज ते मंदिर झालेले आहे. अमेरिकेत जर एखादी चर्च बांधली गेली तर त्यावर पैसे खर्च करून चर्च बांधू नका, असे अमत्र्य सेन अमेरिकेत म्हणू शकतील काय? उत्तर आहे... नाही. त्यांनी असे उद्गार तेथे कधी काढले असेल का? उत्तर आहे... नाही. खटले दाखल न करता कोणाला तुरुंगात टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. Hindu-Amartya Sen-India भारतात न्यायव्यवस्था आहे. कोणाला जर तुरुंगात टाकले गेले तर त्याला जामीन मागता येतो व न्यायालय त्याला जामीन देऊ शकते. जर न्यायालय त्या आरोपींना जामीन देत नसेल तर याचे कारण म्हणजे तपास यंत्रणांनी त्यांच्या विरोधात सादर केलेले भक्कम पुरावे हेच आहे.
 
 
 
भाजपा फैजाबाद (अयोध्या) येथील लोकसभेची जागा हरली. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, भारताला हिंदू राष्ट्र दाखविण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु ते हिंदू राष्ट्र नाही. Hindu-Amartya Sen-India भाजपाला लोकसभेमध्ये कमी जागा मिळाल्या म्हणून भारत हे हिंदू राष्ट्र नाही, असे त्यांना वाटते. फैजाबादची जागा हारण्यामागे मुस्लिमांची एक गठ्ठा मते काँग्रेसला जाणे, हे एक कारण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. तर मग अमत्र्य सेन यांच्या मते त्यावेळेस भारत हिंदू राष्ट्र होते का? आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भाजपाला बहुमत मिळाले किंवा नाही मिळाले तरी भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हे हिंदू लोकांचे राष्ट्र आहे. इस्लामचा उदय होण्यापूर्वी आणि ख्रिश्चानिटीचा जन्म होण्यापूर्वीपासून हिंदू लोक या देशामध्ये राहतात. हे राष्ट्र हिंदूंच्या पराक्रमामुळेच वैभवसंपन्न बनलेले आहे. ही हिंदू लोकांचीच भूमी आहे. एखाद्या वाड्यामध्ये किरायेदारांची संख्या अधिक झाली म्हणून त्याचा मूळ मालक बदलत नाही.
 
 
 
Hindu-Amartya Sen-India जगाच्या पाठीवरून अनेक धर्म-पंथ-संप्रदायाचे लोक भारतात आले व ते येथेच राहू लागले. असे असले तरी त्यांच्या नावावरून भारत ओळखला जाणार नाही. हे हिंदू लोकांचे राष्ट्र आहे, ही वस्तुस्थिती आहे. जसे अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे. जपान जपानी लोकांचा आहे. इंग्लंड इंग्लिश लोकांचा आहे. तसा हिंदुस्तान हिदूंचा आहे. याचा अर्थ इथे इतर धर्मीय लोकांनी राहू नये, असा नाही. ते इथे राहू शकतात. परंतु, आपण हिंदूंच्या हिंदुस्थानात राहत आहोत, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे व जगानेसुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे. Hindu-Amartya Sen-India एखाद्या विशिष्ट धर्माची किंवा जातीची संख्या या देशात वाढल्यामुळे हा देश त्या जातीच्या नावावरून ओळखला जाणार नाही. उदाहरणार्थ आपण अनेक वेळा विचारतो की लंका कोणाची? तर कोणीही उत्तर देईल रावणाची. रावणानंतर अनेक राजे लंकेमध्ये होऊन गेले तरीही आज लंका म्हटली की रावणाचे नाव समोर येते. पूजनीय डॉक्टर हेडगेवार म्हणायचे की, हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून हिंदुस्तान हिंदूंचा आहे असे नाही तर या देशात शेवटला हिंदू शिल्लक राहतपर्यंतसुद्धा हा देश हिंदूंचाच राहील.
 
 
Hindu-Amartya Sen-India एखाद्या वटवृक्षावर खूप साऱ्या वेली चढल्या, खूप साऱ्या पक्ष्यांनी आपली घरटी केली, खूप वेगवेगळ्या रंगांची फुले उगविली तरीसुद्धा त्याच्याकडे बघणारा माणूस, हे काय आहे म्हणून कोणी त्याला विचारले तर तो म्हणेल हा वटवृक्ष आहे. तसेच या देशाचे आहे. आमचा स्वभाव सर्वसमावेशक आहे. शक, हूण, यवन इत्यादी आक्रमक भारतामध्ये आले व पुढे ते भारतातच राहू लागले. इथल्या संस्कृतीशी ते समरस झाले. आज कोणालाही वेगळे काढून सांगता येणार नाही की कोण शक आहे, कोण हूण आहे, कोण यवन आहे. इस्लाम आणि ख्रिश्चानिटी आपले वेगळे अस्तित्व जपून आहे. त्या शकांसारख्या समरस झाल्या नाही. ते इथे राहू शकतात. परंतु, त्यांनीही हे लक्षात ठेवावे की, हा हिंदूंचा देश आहे. या देशात हिंदू म्हणतील ती पूर्व दिशा असली पाहिजे. Hindu-Amartya Sen-India भाजपा बहुमताने सत्तेमध्ये येऊ दे अथवा विरोधी पक्षात बसू दे, तरीही हे हिंदू राष्ट्रच राहणार आहे.
 
 
 
कोणाला निवडून द्यायचे हा स्थानिक जनमतांचा कौल आहे. त्याचा राष्ट्राच्या आत्म्याशी संबंध नाही. हिंदू ही या देशाची ओळख आहे. एखादा मुस्लिम मनुष्य जर जपानमध्ये गेला तर तो जपानी माणूस त्याला विचारेल की, तू कोण आहे? त्यावर तो उत्तर देईल की, मी मुस्लिम आहे. Hindu-Amartya Sen-India तरी तो जपानी माणूस त्याला विचारेल की, तू कोण आहेस. तो ज्यावेळेस सांगेल की, मी हिंदुस्थानातील मुस्लिम आहे. त्यावेळेस त्याचे समाधान होईल. म्हणून हिंदू हे काही एका धर्माचे नाव नाही ती या देशाची ओळख आहे. भारतीय, महाराष्ट्रीयन, पुणेकर, नागपूरकर ही आमची ओळख आहे. त्यामुळे अमत्र्य सेन व त्यांच्यासहित तथाकथित पुरोगामी, कम्युनिस्ट, जातीयवादी, अर्बन नक्षली या सर्वांनी लक्षात ठेवावे की, त्यांची ओळख ही हिंदू म्हणूनच आहे. हिंदुस्तानी म्हणूनच आहे व याचा त्यांना गर्व असायला पाहिजे.