वर्धा नपत 50 कोटीचा प्रकल्प 5 कोटीत; निविदा रद्द करा

01 Jul 2024 20:55:40
- भाजपाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वर्धा, 
Wardha - Tender Cancel जिल्हा सामान्य रुग्णालयापुढे असलेल्या नपच्या जुन्या जागेवर नव्याने बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली आहे. त्या प्रकल्पाची किंमत 50 कोटी असायला हवी होती. परंतु, ती जागा 7 कोटीत दिल्याने निविदा प्रक्रीया रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने आज 1 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.
 
 
Wardha - Cancel the tender
 
निवेदनात नमुद केल्यानुसार, नपच्या मालकीची 44 हजार चौरस फूट जागा आहे. त्या ठिकाणी नपची जुनी इमारत होती. त्या ठिकाणी यापूर्वी नपची इमारत व व्यापारी संकुल काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या जागेचा आजचा बाजार भाव 100 कोटी आहे. तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात 6 मजली व्यापारी सुंकुल काढण्याचाही ठराव घेण्यात आला होता. त्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूकही करण्यात आली होती. त्यातून नपला वार्षिक 2 कोटी 50 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. त्या प्रकल्पाची किंमत 40 कोटी होती, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
 
 
मात्र, आता अचानक केंद्र सरकारच्या योजनेतून त्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 7 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन निविदा प्रक्रीया करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ज्या प्रकल्पाची किंमत 50 कोटी असायला हवी होती ती फक्त 7 कोटीमध्ये करण्याचे कारण काय, या प्रकल्पासाठी कर्ज का काढण्यात आले, असे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.
 
 
Wardha - Tender Cancel  निवेदनावर अतुल तराळे, डॉ. अभ्युदय मेघे, माजी खासदार सुरेश वााघमारे, अविनाश देव, निलेश पोहेकर, वरुण पाठक, कमल कुलधरिया आदींच्या स्वाक्षरी आहेत.
 
 
जे चांगले ते स्वीकारू : भगत
या संदर्भात मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना असुन त्याच योजनेतून बिन व्याजी कर्ज घेण्यात आले. परंतु, या संदर्भात निवेदन आले. या संदर्भात काही अडचणी असल्यास 5 रोजी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. जे नपच्या हिताचे असेल ते स्वीकारू असे, मुख्याधिकारी भगत यांनी तभा साबेत बोलताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0