110 रुपयात गणवेश कसा शिवणार? पहिल्याच दिवशी विद्यार्थी ‘बेरंग’!

01 Jul 2024 19:54:17
तभा वृत्तसेवा
  
चंद्रपूर,
 
first day-school-Chandrapur शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप होते. पण, यंदा विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी रंगीबेरंगी गणवेशात आले. first day-school-Chandrapur तर जुने विद्यार्थी मागील वर्षीच्या गणेवशात शाळेत पोहोचले. अनेक शाळांत पाठ्यपुस्तके व बुटही कमी पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. जिल्हा परिषदेच्या 1 हजार 593 शाळा आहेत. first day-school-Chandrapur समग्र शिक्षा अभियानातून पाठ्यपुस्तके योजने अंतर्गत 1 लाख 60 हजार 963 विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार 6 लाख 30 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. पण, ही नोंदणी मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार करण्यात आली.first day-school-Chandrapur
 
 

first day-school-Chandrapur 
 
 
त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या वाढल्याने पाठ्यपुस्तके व बुटही कमी पडल्याची ओरड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने केली आहे.first day-school-Chandrapur पटसंख्येनुसार पाठ्यपुस्तके, बुट पुरेशा प्रमाणात द्यायला हवी होती. विद्यार्थी संख्येच्या नोंदणीनुसार कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी व अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला. first day-school-Chandrapur गावात प्रभातफेरी काढून नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळांतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्यातील एक गणवेशाचा कापड दिला जाणार असून, तो विद्यार्थ्यांचे माप घेवून शिवायचा आहे. पण, त्यासाठी 110 रूपयाची तरतूद केली आहे. first day-school-Chandrapur इतक्या कमी पैशात गणवेश शिवणार कसा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दुसर्‍या गणवेशाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया ससनकर यांनी दिली. शासनाकडून गणवेश आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळाले नाही. 110 रूपयात गणवेश शिवण्याचे शासन आदेश आहेत. first day-school-Chandrapur पाठ्यपुस्तके व बुट कमी पडल्याची तक्रार आमच्याकडे अद्याप आली नसल्याची प्रतिक्रिया जिपच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0