पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा होणार

01 Jul 2024 19:56:58
मुंबई,
पेपरफुटी neet paperleakथांबवण्याबाबत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान समोर आले आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या बातम्यांवरून देशभरात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा : 110 रुपयात गणवेश कसा शिवणार? पहिल्याच दिवशी विद्यार्थी ‘बेरंग’!
 
devendra
 
अधिवेशनात विधेयक मांडले जाणार 
काँग्रेस neet paperleakनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (शरदचंद्र पवार), भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आशिष शेलार आणि शिवसेनेचे भास्कर जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सरकार काही करणार का, असा सवाल केला. पेपर लीक होत आहेत हे थांबवण्यासाठी काही कडक कायदा करणार का. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कायदा करण्यासाठी या अधिवेशनात विधेयक मांडले जाईल. नीट युजी चा पेपर फुटल्याचा आरोप आणि इतर विविध परीक्षांमधील अनियमितता लक्षात घेता, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सांगितले होते की, राज्य सरकारने प्रश्नपत्रिका फुटणे थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा आणि दोषींना शिक्षा करावी.  सध्या नीट पेपर लीकचा मुद्दा देशात चांगलाच वादात सापडला आहे. एजन्सी या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हेही वाचा : 'या' लोकांकडे 7581 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत...
Powered By Sangraha 9.0