‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात एल्विश यादवला समन्स

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
लखनौ, 
'Money Laundering' case : पार्टी आयोजित करून नशेसाठी मादकपदार्थ म्हणून सापाच्या विषाचा वापर करणारा युट्यूबर सिद्धार्थ यादव ऊर्फ एल्विश यादवला अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने 23 जुलै रोजी ‘मनी लाँड्रिंग’प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावला आहे, असे बुधवारी अधिकृत सूत्रांनी सांगितले.
 
 
Elvish Yadav
 
'Money Laundering' case : उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पोलिसांनी एल्विश यादव आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची दखल घेत ईडीने मे महिन्यात या संबंधी गुन्हा नोंदवला होता आणि बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप लावले होते. सूत्रांनी सांगितले की, एल्विश यादवला सुरुवातीला या आठवड्यात ईडीच्या लखनौ कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्याचा नियोजित विदेश प्रवास आणि व्यावसायिक कार्यक‘मांमुळे त्याने समन्स पुढे ढकलण्याची मागणी केली.