वर्धेत उद्योग फ्रेंडली वातावरण निर्मिती करणार

: जिल्हाधिकारी कर्डिले

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Collector Kardile : जिल्ह्याच्या विकासात उद्योगांचा वाटा महत्त्वाचा आहे. तरुणांचा कल उद्योगापेक्षा नोकरीकडे अधिक असतो. केंद्र आणि राज्य शासनाने उद्योगांसाठी नवनवीन योजना आणल्या असून तरुणांनी या योजनांचा लाभ घ्यावा. नवीन उद्योग उभारण्यासाठी इनक्युबेशन कम बिजनेस फ्यॅसिलिटी सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून जिल्ह्यात उद्योग फ्रेंडली वातावरण निर्माण होत असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
 

UHU 
 
इनक्युबेशन कम बिजनेस फ्यॅसिलिटी सेंटर वर्धा येथे आज 10 रोजी इंडस्ट्री इंस्टिट्यूट राऊंड टेबल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कौशल विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्तनीता औघड, जिल्हा औद्योगिक अधिकारी प्रवीण घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील हजारे, इरॉस ग्रुपचे अतुल पांडे, वर्धा एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, लघु उद्योग भारतीचे हरीश हांडे, डॉ. शिवाजी धवड यांची उपस्थिती होती.
 
 
जिल्हाधिकारी कर्डिले पुढे म्हणाले, आय.आय.एम.च्या सहकार्याने जिल्ह्यात अनेक उद्योग येत असून इंडस्ट्रियल ग्रोथ इंजिन म्हणून जिल्ह्याची वाटचाल होत आहे. तरुणांनी व्यवसायाभिमुख दृष्टिकोन ठेवल्यास रोजगाराच्या नव्या संधी जिल्ह्यात उपलब्ध होईल. नव उद्योजकांना प्रशिक्षण देण्याची सोय येत्या काळात इनक्युबेशन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी उद्योजकांसोबत सामंज्यस करार करण्यात आले. नवउद्योजकांना उद्योगाच्या क्षेत्रात विविध करिअरच्या संधी, उद्योगाचे विविध प्रश्‍न तसेच उद्योजकांना येणार्‍या समस्या, नवउद्योजकांना मार्गदर्शन करुन तसेच त्यांच्या कल्पनांचे आदानप्रदान, उद्योगाच्या क्षेत्रात नावीन्यता आणण्यावर भर देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.