लाडकी बहिण योजनेसाठी शिबीर घ्यावीत

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
बुलडाणा, 
राज्य शासनाने Dear sister schemeमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. नागरी भागात महिलांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन नगर पालिका क्षेत्रात शिबीरे आयोजित करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 10 जुलै रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले, नगर पालिकेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी नगर पालिकेच्या कार्यालयात कायमस्वरूपी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

sister 
तसेच नारीशक्तीDear sister scheme अ‍ॅप, वेबसाईट, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुविधा केंद्राची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तालुकानिहाय उपलब्ध करून देणयात आली आहे. पंचायत समित आणि ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामाध्यमातूनही अर्ज सादर करता येणे शक्य होणार आहे.ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्र आणि जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शिबीरे घेऊन योजनेचे अर्ज भरून घेण्यात यावे. नागरी भागात घेण्यात येणार्‍या शिबिराचे नियोजन करावे. त्यानुसार वेळापत्रक तयार करून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया करावी. एकत्रितरित्या अर्ज भरल्यामुळे फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर शिबिर आयोजित करून याठिकाणी येणार्‍या सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्यात यावे. याठिकाणी शासकीय यंत्रणांनी उपस्थित राहून अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करावी. नगर पालिका क्षेत्रात अर्ज करण्यासाठी अडचण आल्यास मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.