14 हजार रोपे, 50 हजार सिड बॉलचे लक्ष्य

*केंद्रीय दारूगोळा भांडाराचा वनमहोत्सव

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुलगाव, 
Forest Festival of Ammunition Store  : केंद्रीय दारू गोळा भांडारातील अधिकारी, सैनिक, त्यांचे परिवार, आर्मी पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक व केंद्रीय दारूगोळा भांडारातील स्थानिक कर्मचार्‍यांनी संकल्प करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. या महिन्याअखेर कारगील शहीद दिवसापर्यंत 14 हजार रोपांची लागवड व 50 हजार सिड बॉल झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
 
 
HJH
 
ब्रिगेडियर कौशलेश पंघाल, डी. वाय. कमांडंट कर्नल व्ही. शशिकुमार, प्रशासकीय अधिकारी कर्नल प्रशांत शर्मा, सी. सी. एम. ई. मेजर उज्वला डगर, आय. एस. ओ. मेजर अभिषेक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा वन महोत्सव साजरा केला जात आहे. केंद्रीय दारुगोळा भांडाराच्या परिसरामध्ये 5 जुलैपासून या वनमहोत्सवाला प्रारंभ झाला. केंद्रीय विद्यालय व आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी रोपांच्या माध्यमातून वृक्षारोपण केले. त्यांना सिडबॉलचे वितरण करण्यात आले. केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या परिसर, निवासी परिसर तसेच टेकडीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. या परिसराने हिरवा कंच गालीचा पांघरलेलाच आहे. परंतु वृक्षांच्या माध्यमातून घनदाट वृक्षांची ठिकठिकाणी बहार दिसून यावी. म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येते. 26 जुलै कारगील दिवसपर्यंत हा वृक्षारोपण अविरत सुरू राहणार आहे. 7 जुलैला केंद्रीय दारूगोळा भंडाराचे अधिकारी व सैनिक यांच्या कुटुंबीयांनी ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले.