केवळ विरोध करायचा, समाजाशी घेणं-देणं नाही

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
- मंत्री गिरीश महाजनांची विरोधकांवर टीका

मुंबई, 
विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आरक्षणासाठी आंदोलन करतात आणि चर्चेसाठी बोलाविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकून चर्चेपासून पळ काढतात. विरोधकांची आरक्षणासंदर्भातली ही भूमिका म्हणजे पोटात एक आणि ओठात एक अशी आहे. यांना केवळ विरोध करायचा असून, समाजाशी काहीही देणं-घेणं नाही, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री Girish Mahajan गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्या बैठकीचे निमंत्रण विरोधकांना आधीच देण्यात आले होते.
 
 
Girish Mahajan
 
सगळ्याच आरक्षणाच्या बाबतीत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत विरोधकांची आहे. आरक्षणावर मार्ग काढायचा नाही, भूमिका स्पष्ट करायची नाही हेच विरोधकांनी ठरवलेले आहे. फक्त विरोधासाठी विरोध करायचा, असेच त्यांचे धोरण असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी कधीही आरक्षण दिलेले नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीही विषय काढला नाही. पण आम्ही बैठक घेतली आणि तोडगा काढू म्हटले तर, आम्ही येणार नाही. तुम्ही काही निर्णय घ्या, असे बोलतात. आम्ही निर्णय घेतला, की त्याचा विरोध करायचा. ही विरोधकांची भूमिका दुट्टपी आहे. अशी टीका करत, विरोधकांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असा सल्लादेखील Girish Mahajan महाजनांनी दिला.