जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा पुन्हा समन्स

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
भामटा सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या ‘मनी लॉन्ड्रिंग'  प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बुधवारी समन्स बजावून चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविवदर मोहनqसग यांची पत्नी आदितीसिग यांच्यासह उच्चभ्रू लोकांची जवळपास २०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात ईडीने Jacqueline Fernandez जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती.
 
 
Jacqueline Fernandez
 
चंद्रशेखरने या गुन्ह्यातील रकमेचा वापर Jacqueline Fernandez जॅकलिनला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी केला होता, असा आरोप ईडीने केला आहे. चंद्रशेखरची गुन्हेगारी पृष्ठभूमी माहीत असतानाही त्याने दिलेल्या महागड्या भेटवस्तू आणि दागिने जॅकलिन फर्नांडिसने स्वीकारले, असे ईडीने २०२२ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसची पाच वेळा चौकशी केली आहे. आपण निर्दोष असून, चंद्रशेखरच्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असे तिने चौकशीत सांगितले आहे.