विस्तार अधिकारी, ग्रामसेवक मिनीमंत्रालयात आल्यास ‘खबरदार’

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
- सीईओंनी काढले फर्मान : विनापरवानगी येणार्‍यांवर कारवाई

यवतमाळ, 
जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक वारंवार येत आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनांची पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे यापुढे गटविकास अधिकार्‍यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत येऊच नये, असे पत्रच मुख्य कार्यकारी अधिकारी Mandar Patki मंदार पत्की यांनी काढले आहे.
 
 
y10July-Z-P-Yavatmal
 
ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत शासनाच्या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यालयात येतात. मात्र, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेत विनाकारण चकरा मारतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी Mandar Patki मंदार पत्की यांनी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषदेत येण्यासाठी लेखी परवानगी न घेता आल्यास विनावेतन रजा धरण्यात येईल, असे पत्र काढले आहे. सीईओंच्या या आदेशामुळे कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
अनेकांचा मुख्यालयात ठिय्या
जिल्हा परिषद, पंचायत समितीत काही ग्रामसेवकांनी पदेान्नती घेतली आहे. त्यामुळे इतर ग्रामसेवकांवर अतिरिक्त ग्रामपंचायतींचा भार पडला आहे. अशा ग्रामसेवकांनासुद्धा ग्रामपंचायत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.