‘पतंजली’ने 50 लाख जमा करा

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
- आदेशाचे उल्लंघन केल्याने हायकोर्टाचा दणका
 
मुंबई, 
दुसर्‍या कंपनीने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणाशी संबंधित कापूर उत्पादने विकण्यापासून रोखण्याच्या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने Patanjali Ayurveda पतंजली आयुर्वेदला 50 लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे. मंगलम् ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या आरोपांनंतर, हायकोर्टाने ऑगस्ट 2023 मध्ये अंतरिम आदेशाद्वारे पतंजली आयुर्वेद लिमिटेडला कापूर उत्पादने विकण्यापासून रोखले.
 
 
Patanjali Ayurveda
 
8 जुलै रोजी न्या. आर. आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने नमूद केले की, पतंजलीने जूनमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, कापूर उत्पादनांच्या विक्रीवर मनाई आदेश देण्याच्या आधीच्या आदेशाचे उल्लंघन मान्य केले. प्रतिवादी क‘मांक 1 (पतंजली) द्वारे 30 ऑगस्ट 2023 रोजीच्या मनाई आदेशाचे असे सतत उल्लंघन या न्यायालयाकडून सहन केले जाऊ शकत नाही, असे न्या. छागला यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली. खंडपीठाने सांगितले की, मनाई आदेशाचा अवमान/उल्लंघन केल्याबद्दल आदेश देण्यापूर्वी Patanjali Ayurveda पतंजलीला 50 लाख रुपये जमा करण्याचा निर्देश देणे योग्य ठरेल. हायकोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवली आहे.
 
 
 
Patanjali Ayurveda : ऑगस्ट 2023 मध्ये उच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशात पतंजलीला कापूर उत्पादनांची विक्री किंवा जाहिरातीवर बंदी घातली होती. मंगलम् ऑरगॅनिक्सने पतंजली आयुर्वेद विरुद्ध त्यांच्या कापूर उत्पादनांच्या कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत खटला दाखल केला होता. नंतर पतंजलीने कापूर उत्पादनांची विक्री सुरू ठेवल्याने ती अंतरिम आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा दावा याचिकेत केला होता. पतंजलीचे संचालक रजनीश मिश्रा यांनी जून 2024 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची हायकोर्टाने दखल घेतली होती. प्रतिज्ञापत्रात पतंजलीने बिनशर्त माफी मागितली आणि हायकोर्टाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.