वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला

लाखांदूर पोलिसांची कारवाई

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
लाखांदूर,
Sand smuggling : चुलबंद नदी घाटातील वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात आले.9 जुलै रोजी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आली.
 
 
GJHG
 
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक हेमंत अंतराम बोरकर रा.लाखांदूर याच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी शहरात गस्तीवर असताना न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने वाळू वाहतूक करताना दिसला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचा-यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून तो अडवला. चालकाकडे वाळू वाहतुकीची रॉयल्टी मागितली असता मद्यधुंद चालकाने रॉयल्टी नसल्याची माहिती दिली. त्यामुळे रेतीसह ट्रॅक्टर जप्त करून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
 
सदर कारवाई लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, हवालदार मिलिंद बोरकर, पोलिस नायक राजन चुटे यांनी केली.