कारंजा लाड,
विद्यार्थ्यांचे शैक्षणिकabvp foundation day समस्या सोडविण्यापासून तर त्यांमध्ये राष्ट्रप्रती आत्मीयता निर्माण करण्याचे कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सतत व निरंतर स्वरूपात करत येत आहे. आज जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अभाविप संपुर्ण जगभरात प्रसिध्द आहे. या विद्यार्थी संघटनेचा स्थापना दिन अभाविप कारंजा लाड कार्यकारिणीद्वारा ८ जुलै रोजी साजरा करण्यात आला.९ जुलै १९४९ रोजी स्थापन झालेल्या अभाविपला ७६ वर्ष पुर्ण झाले असून त्या अनुषंगाने अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्वत्र करण्यात येत आहे. कारंजा लाड नगर कार्यकारिणीद्वाराही १० वी व १२ वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शहरातील किसनलाल नथमल गोयंका महाविद्यालयात पार पडला. यावेळी एकूण ४० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या abvp foundation dayअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप येवले, मुख्य अतिथी म्हणून कारंजा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिरीष चवरे, प्रमुख वक्ता म्हणून अभाविप जिल्हा संयोजिका विजया मोरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून रा. स्व. संघाचे जिल्हा सहकार्यवाह पंकज करडे उपस्थित होते. तसेच यावेळी अभाविप कारंजा लाड नगराची २४-२५ ची कार्यकारिणीही घोषीत करण्यात आली. त्यामध्ये नगर अध्यक्ष म्हणून डॉ. किरण वाघमारे, नगर उपाध्यक्ष म्हणून प्रा. रोहन जाधव, नगर मंत्री म्हणून रुद्र लोटे, नगर सह मंत्री म्हणून ओम शेलवंटे व अंजली शिंदे, कार्यालय प्रमुख निरज सुरटकर, विद्यार्थिनी प्रमुख श्रेया चौधरी व सह प्रमुख प्राप्ती कदम, सोशल मीडिया प्रमुख हर्ष टेवरे, महाविद्यालय प्रमुख स्मित लोढाया तसेच एसएफडी प्रमुख चारुल गुंठेवार, एसएफएस प्रमुख सौरभ जयराज, जनजाती कार्य प्रमुख ब्रम्हा चव्हाण व सहप्रमुख श्रीपाड जोंधळे, वस्तीगृह प्रमुख रोहीत प्रधान तर कोष प्रमुख म्हणून स्वराज महाजन यांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर निलय बोंते, सुमित बरांडे, विजया मोरे, जयंत इंगळे, शुभम मुडे व प्रा. सुरेश मापारी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन स्वराज महाजन यांनी केले. तर आभार ओम शेलवंटे यांनी मानले.