अधिकृत मेल अकाऊंट रद्द न झाल्याची खात्री करा

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
- केंद्राच्या कर्मचाऱ्यांना संशयास्पद ई-मेल
 
नवी दिल्ली, 
केंद्रीय सचिवालयातील अनेक कर्मचाऱ्यांना मंगळवारी एक संशयास्पद e-mail account ई-मेल प्राप्त झाला. या घटनेनंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका संघटनेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. विविध मंत्रालयांमध्ये कार्यरत केंद्रीय सचिवालय सेवा कर्मचाऱ्यांना आलेल्या मेलमध्ये, त्यांचे अधिकृत मेल अकाऊंट रद्द झाले नसल्याची खात्री करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले होते.
 
 
e mail
 
सीएसएस अधिकारी केंद्रीय सचिवालयाचा कणा आहेत, अशा आशयाची पोस्ट केंद्रीय सचिवालय सेवा अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या सीएसएस फोरमने एक्सवर केली आहे. फोरमने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
 
 
e-mail account : सीएसएस फोरमचे सरचिटणीस आशुतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मेल आलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबबात अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय सचिवालयाचे संपूर्ण कामकाज आता ऑनलाईन होत असल्याने अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मिश्रा म्हणाले. आमच्या संपर्काची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.