पाऊणे दोन लाखाचा गुटखा पकडला

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
चिखली,
अमरावतीवरून gutka seizedसैलानीकडे मानवी आरोग्यास अपायकारक असणारा गुटखा घेऊन जाणार्‍या स्विफ्ट डिझायर गाडीवर पाळत ठेवून पोलिसांनी छापा टाकला असता यामधून एकलाख 83 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.
 
 
gutka seized
 
चिखली बुलढाणाgutka seized रोडवरील हातणी गावाजवळ अमरावती वरून आलेली स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक 27 एआर8253 सैलानीकडे जात असताना थांबवून पोलीस उपनिरीक्षक नितीन चौहाण, पोहेकाँ. विजय कीटे, प्रशांत धंदर यांनी तपासणी केली असता या गाडीमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखूजन्य केशरयुक्त विमल पान मसाल्याचा गुटखा मिळून आला. यामध्ये जवळपास एक लाख 83 हजार 40 रुपये किंमतीचा गुटखा वाहन,मोबाईल असा एकूण 4 लाख 90 हजार 40 रुपयांचा माल चिखली पोलीसांनी जप्त केला आहे. सरकारी फिर्यादी सुधाकर काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा यांच्या तक्रारीवरून आरोपी ताबीज उमेर अब्दुल हमीद कुरेशी राहणार चांदुर रेल्वे, अमरावती व जनक नरेश बंदबेरू राहणार जुना गाव बुलढाणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.