दोन जहाल महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण

    दिनांक :11-Jul-2024
Total Views |
गडचिरोली, 
हिंसाचाराच्याwomen naxalites surrender जीवनाला कंटाळून दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई (36) रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा व अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती (34) रा. मरकेगाव ता. धानोरा असे आत्मसमर्पित महिला नक्षल्यांचे नाव आहे.
 
 

erer 
प्लाटून पार्टी women naxalites surrenderकमिटी सदस्य प्रमिला बोगा ही सन 2005 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होवून सन 2011 पर्यंत कार्यरत होती. सन 2011 ते 14 मध्ये वैरागड दलममध्ये काम केले. 2014-15 मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये कार्यरत होती. 2015 मध्ये कंपनी नं. 4 मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. 2018 मध्ये कंपनी नं. 4 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन 2021 पर्यंत कार्यरत होती. 2022 मध्ये डिके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये बदली होऊन पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर 20 चकमक, 2 जाळपोळ व 18 इतर अशा एकूण 40 गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. प्रमिलाच्या डोक्यावर महाराष्ट्र शासनाने 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
 

ererwqw 
अखिला पुडो ही सन 2010 मध्ये टिपागडwomen naxalites surrender दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत होती. 2013-14 मध्ये प्लाटुन नं. 15 मध्ये सदस्य पदावर काम केले. 2014-15 मध्ये कंपनी नं. 4 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. 2015 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. त्यानंतर 2018 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर 2 चकमक, 4 खून, व 1 इतर अशा एकूण 7 गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. अखिलाच्या डोक्यावरही महाराष्ट्र शासनाने 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. चळवळीतील वरिष्ठ कॅडरचे चळवळीकरीता पैसे गोळा करण्यास सांगतात, गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात, स्त्रियांना भेदभावजनक वागणूक दिली जाते, वरिष्ठ नक्षली फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करतात, विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही, सततच्या अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे,, खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात, चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात, अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. याला कंटाळून आत्मसमर्पण केल्याचे महिला नक्षलींनी सांगितले आहे. सदर नक्षल्यांचे आत्मसमर्पण घडवून आणण्याची कारवाई नागपूरचे पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल व सीआरपीएफ 113 बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.