भावना गवळी विजयी !

13 Jul 2024 18:02:09
शिवसैनिकांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा
वाशीम, 
नुकत्याच bhavna gavli पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांनी २४ मते घेऊन विजय मिळविला. या विजयाचा वाशीमसह जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटयाची आतषबाजी करुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
 
 

bhavna gavli  
भावना गवळीbhavna gavli ह्या सातत्याने पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्याआधी त्यांचे वडीलही शिसेनेचे खासदार होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील शिवसैनिकामध्ये तीव्र संताप पहायला मिळाला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत यवतमाळ - वाशीम मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराला बसला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देवून जनभावनेचा आदर केला. मंत्रीमंडळातही मंत्री पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे सेनेच्या वतीने पाटणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व ठिकठिकाणी फटाके फोडून घोषणा देत विजयोतत्सव साजरा केला.
Powered By Sangraha 9.0