कानोसा
- अमोल पुसदकर
Pandharpur-Vitthal पांडुरंग, विठ्ठल हे महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विठ्ठलाची पूजा होते. पंढरी हे येथील वारकऱ्यांचे माहेर आहे. पिढ्यान्पिढ्या विठ्ठलाची ही सेवा सुरू आहे. Pandharpur-Vitthal विठ्ठल भक्ती सुरू आहे. आषाढी-कार्तिकीला संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटकातून भक्त पंढरपूरला जमतात. जवळपास १२ ते १५ लाख भक्त या वारीत सहभागी होतात. अतिशय शिस्तीमध्ये भक्तिपूर्ण वातावरणात वारीचा हा सोहळा संपन्न होतो. Pandharpur-Vitthal ठिकठिकाणी रिंगण धरले जातात. देहू, आळंदी, सासवड अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून ज्या ठिकाणी संतांच्या समाधी आहेत किंवा संतांची जन्मगावे आहेत, त्या ठिकाणावरून पंढरपूरला ते संत नसले, तरीही त्यांच्या नावाची पालखी भक्त आजही विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जातात. Pandharpur-Vitthal शेगाववरूनही दरवर्षी पालखी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असते. प्रत्यक्ष गजानन महाराज विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. तेही आपल्या वारकऱ्यांच्या सोबत होते. म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या सर्वच संतांनी वारी चुकवली नाही.
गाडगे महाराज पंढरीच्या वारीमध्ये जायचे. Pandharpur-Vitthal तेथे व्यवस्था लावण्यासाठी त्यांनी धर्मशाळा सुरू केली. भक्तजनांच्या राहण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे सर्व संत आणि भक्त या सर्वांनी मिळून पंढरीची वारी अजरामर करून टाकलेली आहे. भक्तांमध्ये भक्त ‘पुंडलिका'चे नाव सर्वांना माहीत आहे. फार पूर्वी पुंडलिक नावाचा एक भक्त होता. तो आपल्या आई-वडिलांची सेवा करीत नसे. एकदा त्याला साक्षात्कार झाला. त्याला समजले की, आपल्या आई-वडिलांची सेवा करणे हीच परमेश्वरी सेवा आहे. Pandharpur-Vitthal त्यामुळे तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये लीन राहू लागला. एकदा साक्षात परब्रह्म म्हणजे भगवान पांडुरंग या पुंडलिकाच्या भेटीला आले. त्यावेळेस तो आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. भगवंताने पुंडलिकाला आवाज दिला. त्यावेळी पुंडलिकाने दोन विटा फेकल्या. त्या विटांवरच पांडुरंग उभा झाला. आजही पांडुरंगाची मूर्ती ही विटेवर उभा असलेली मूर्ती आहे. म्हणजे भक्तांनी फेकलेल्या विटेवर देव उभा राहिला. शेकडो वर्षांपासून आजही तो पंढरीला उभा आहे.
Pandharpur-Vitthal भक्तीची ही शक्ती आहे. भक्ताच्या समर्पणाचा हा चमत्कार आहे. वारीचा इतिहास १२०० वर्षे जुना आहे. संत ज्ञानेश्वरांचे वडील पंढरीच्या वारीला जायचे. अफझल खानाने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ध्वस्त केले होते. त्याचेही कारण हेच होते की, संपूर्ण महाराष्ट्र पंढरीच्या विठोबाला मानत होता. अफझल खानाला संपूर्ण महाराष्ट्राला हा संदेश द्यायचा होता की, बघा तुमचा देवसुद्धा सुरक्षित नाही. अफजल खान गेल्यावर लोकांनी विठ्ठलाचे मंदिर पुन्हा एकदा उभे केले. मुसलमानी राज्यातही पंढरीची वारी सुरूच होती. कुठून कोणती टोळधाड येईल, कोणता बादशहाचा सरदार आपल्याला अटक करून ठेवेल याची कुठलीही तमा न बाळगता त्याही काळात वारी सुरू होती, हे उल्लेखनीय. गावोगावी विठ्ठल मंदिरे व विठ्ठल भक्ती आहे. आषाढी-कार्तिकीला पंढरीच्या वारीला जाणारा खूप मोठा समाज आहे. Pandharpur-Vitthal ठिकठिकाणी विठ्ठल-रखुमाईची मंदिरे आहेत. गावामध्ये प्रभात फेरी निघते. पांढरे कपडे घातलेले, धोतर घातलेले आणि अगदी लहान मुले प्रभात फेरीमध्ये टाळ-मृदंगाचा गजर करीत ‘विठ्ठल - विठ्ठल' म्हणत विठ्ठल भक्ती जागृत ठेवताना दिसतात.
लहान थोरांमध्ये विठ्ठल भक्ती : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये विठ्ठल भक्ती रुजलेली आहे. आज १२०० वर्षांपासून कितीतरी पिढ्या उलटून गेल्या तरी विठ्ठलाचे अभंग, विठ्ठलाची आरती, विठ्ठलाचे भजन सर्वदूर सर्वत्र गायले जातात. त्याची गोडी आजही कायम आहे. वारी म्हणजे सामजिक समरसतेचा मोठा अध्याय आहे. ज्या काळात समाजामध्ये जातिभेद मोठ्या प्रमाणावर होता अशा काळात वारकऱ्यांमध्ये कुठलाही जातिभेद पाळला जात नव्हता. Pandharpur-Vitthal ‘ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस ।' वारकरी पंथाची मुहूर्तमेढ, पाया ज्ञानदेवांच्या काळात रचिला गेला (१२७५). ‘तुका झालासे कळस' म्हणजे संत तुकारामांच्या काळात या वारकरी पंथाला भव्य रूप प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी अशी सर्वच जाती-पंथातील कितीतरी संतांची नावे घेता येतील की, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या चरणी समर्पित केले.
ज्या महार समाजाला अस्पृश्यतेचा सर्वात जास्त फटका पडला त्या समाजात संत चोखामेळा हे जन्माला आले. त्यांनी आयुष्यभर विठ्ठल भक्ती केली. वारकऱ्यांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते. Pandharpur-Vitthal त्यांच्या पत्नीने अभंगाची रचना केलेली आहे. वारी म्हणजे आनंदी-आनंद : लहान-थोर, स्त्री-पुरुष आदी सर्व शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरीला पोहोचतात. सर्व प्रकारांच्या शारीरिक व्याधी व विकारांवर मात करून पायी चालत ‘ज्ञानबा तुकाराम', ‘पंढरीनाथ महाराज की जय' असा जयघोष करीत पंढरीला पोहोचतात. सासरी गेलेली लेक ज्या आनंदाने माहेरी जाते, तोच आनंद सर्वांना पंढरीच्या वारीतून मिळतो. ‘माझे माहेर पंढरी' असा त्यांचा भाव असतो. पूर्वीपासून चंद्रभागा ही गंगेइतकीच पवित्र आहे. पूर्वी चंद्रभागेचे वाळवंट हेच त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण होते. सर्व साधू-संतांच्या नावाने आज पंढरपुरात धर्मशाळा उभ्या आहेत. वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात. तासन्तास शांतपणे कुठल्याही व्हीआयपी दर्शनाची अपेक्षा न करता नामस्मरण करीत उभे राहतात. Pandharpur-Vitthal वारीच्या संपूर्ण मार्गात वारकऱ्यांची चहा, नास्ता, जेवण, स्नानादी व्यवस्था मार्गातील गावोगावी लोक करीत असतात. अगदी चांगल्या चांगल्या घरचे लोक वारीमध्ये कुठल्याही प्रकारच्या बडेजावची अपेक्षा न करता वारीमध्ये मिळून पायी चालतात. लोक जेवू घालतील ते जेवतात.
पंढरीला पोहोचल्यावर धर्मशाळेत झाली व्यवस्था तर ठीक; अन्यथा तंबूंमध्ये किंवा जागा मिळेल तिथे आपली पथारी पसरून आपल्या लोकांसोबत राहण्यामध्ये धन्यता मानतात. सर्वांचे लक्ष्य एकच असते; ते म्हणजे विठ्ठल दर्शन. विठ्ठलाचे नयनरम्य दर्शन होतपर्यंत त्यांची कोणतीही तक्रार नसते. अनेक स्वयंसेवी संघटना पुण्यामध्ये ठिकठिकाणी शौचालय उभे करून निर्मल वारीचा प्रयोग करीत आहेत. अनेक संस्था आरोग्य व्यवस्था उभी करीत आहेत.Pandharpur-Vitthal विविध स्तरांतील लोक वारकऱ्यांची जी करता येईल, ती सेवा देतात. अगदी चप्पल दुरुस्त करण्याचीसुद्धा सेवा दिली जाते. वारकरी फारसे शिकले-सवरलेले असतील वा नसतील, ते सर्व प्रकारांच्या व्यवस्थांना प्रतिसाद देत शिस्तीमध्ये कार्य करीत असतात. कुठलीही घाईगडबड नाही, चेंगराचेंगरीच्या घटना नाही, बेशिस्तपणा नाही. वारीमुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळते. १५ लाख लोकांनी जवळचे २००० रुपये जरी खर्च केले तरी ३०० कोटींपेक्षा अधिक रुपये समाजात खेळवले जातात.Pandharpur-Vitthal ‘एक तरी ओवी अनुभवावी' असे म्हटलेले आहे. केवळ विठ्ठल नामाचा ध्यास घेतलेली ही वारी आपण सर्वांनी एकदा तरी नक्कीच अनुभवावी अशी आहे. सर्वांसोबत एकदा हाक मारावी... ‘बा विठ्ठला मायबापा' आणि त्याचे दर्शन घ्यावे.
९५५२५३५८१३