पीक विमा योजनेची मुदत 15 सप्टेंबर करावी

    दिनांक :16-Jul-2024
Total Views |
- शेतकरी संघटनेची मागणी

यवतमाळ, 
राज्य सरकारने शेतकर्‍यांना पंतप्रधान Pik Vima Yojana पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर करावी, अशी मागणी शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीने केली आहे. राज्याचा हवामान पीक पेरणी व पीक परिस्थितीचा 15 जुलै 2024 अखेरचा खरीप हंगाम 2024-25 च्या साप्ताहिक अहवालानुसार महाराष्ट्राचे ऊसासह सरासरी खरीप पीकक्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणीक्षेत्र 124.48 हेक्टर म्हणजे 82 टक्के आहे.
 
 
Shetkari sanghatana
 
या एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रात भात 3.1 टक्के, ज्वारी 0.7 टक्के, बाजरी 2.8 टक्के, रागी 0.1, मका 7.8, तूर 8.9, मूग 1.7, उडीद 2.6, शेंगदाणा 1, सोयाबीन 38.7, कापूस 31.2, उस 0.9 आणि इतर 0.7 याप्रमाणेच पेरणी झाली असल्याचे या अधिकृत अहवालात म्हटले आहे. गेली 25 वर्षे शेतकर्‍यांना पीक विमा योजनेत सहभागी होता येऊ नये म्हणून पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदा पीक विमा योजना 2024 मध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै केली आहे.
 
 
Pik Vima Yojana  कृषी विभागाची बौद्धिक दिवाळखोरी खरीप पीकविमा योजनेत सहभागी होण्याच्या तारखा जाहीर करते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) आपत्कालीन परिस्थितीत पिकांचे नियोजन चौकटीत दिलेल्या खालील वेळापत्रकानुसार खरीप पीक पेरणी 31 ऑगस्टपर्यंत करता येते. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात खरीप पेरणी अधिकृतपणेच 31 ऑगस्टपर्यंत चालत असल्यामुळे स्वाभाविकपणेच पीक विमा योजनेची मुदत ही 15 सप्टेंबर हीच असायला हवी, असेही शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीप्रमुख मिलिंद दामले यांनी म्हटले आहे.
अधिकृत पीक पेरणी वेळापत्रक :
8 ते 15 जुलै : कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल.
16 ते 31 जुलै : बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, तूर, एरंडी, धणेे.
1 ते 15 ऑगस्ट : तीळ, बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर, एरंडी, धणे.
16 ते 31 ऑगस्ट : बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, धणे.