नागपूर,
Dhapewada लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले धापेवाड्याला विदर्भाचे पंढरपूर म्हटले जाते.आषाढी एकादशीपासून विदर्भातील वारकरी मोठ्या संख्येने 'ज्ञानोबा -तुकाराम'चा गजर करीत विठुरायाला भेटण्यासाठी चालत चालत,विठ्ठल-विठ्ठल अशा जयघोषात धापेवाड्यात दाखल होत असतात.एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो.
चातुर्मासामध्ये पुजा अर्चना,दान धर्माला अधिक महत्त्व असल्याने भाविक मोठ्या संख्येने धार्मिक स्थळी येत असतात. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी विदर्भातले पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारेDhapewada धापेवाडा गाठून विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात.विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनाने मनाला अतिशय शांतता मिळत असते याकरीता विदर्भातील शेतकरी, वारकरी भक्त मंडळी मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात.या दर्शन सोहळ्यात महेश चकोले,रमेश मेहर,चंद्रप्रकाश चकोले,सुनिता मेंढुले,माधुरी मेहर,शोभा गिरडकर,स्मित चकोले सहभागी झालेत.
सौजन्य :रमेश मेहर संपर्क मित्र,