नागद्वार पचमढी यात्रेसाठी बसेसची व्यवस्था

19 Jul 2024 18:37:35
- प्रत्येक अर्धा तासानंतर बस उपलब्ध
 
नागपूर,
buses for Nagdwar Pachmarhi Yatra :एसटी महामंडळाने नागपूर ते पंढरपूर यात्रा स्पेशल बसची सेवा दिल्यानंतर आता नागद्वार पचमढी यात्रेसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत ही विशेष बससेवा राहणार आहे. या बसेस गणेशपेठ मुख्य बसस्थानकावरुन सायंकाळी 4 वाजतापासून दर अर्ध्या तासाने बस पचमढीसाठी निघणार आहे. तसेच पचमढी ते नागपूर करीता - येणार्‍या बस या दुपारी 3 वाजतानंतर उपलब्ध आहे.
 
 
Nagdwar Pachmarhi Yatra
 
तसेच महामंडळाद्वारे नागद्वार यात्रेकरीता जाणार्‍या भावीकांसाठी गणेशपेठ बसस्थानकावर तिकिटाचे आगाऊ आरक्षणाची सोय सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आरक्षणाबाबत तसेच अधिक माहितीसाठी प्रवाश्यांनी आगार व्यवस्थापक गणेशपेठ आगार किंवा बसस्थानक प्रमुख गणेशपेठ बसस्थानक नागपूर येथे संपर्क करावा. नागपूर ते पचमढी नागद्वार यात्रेकरिता जाणार्‍या भाविकांनी बससेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
 
 
नागद्वार यात्रेचे नियोजन
buses for Nagdwar Pachmarhi Yatra : महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील भाविकांचे खास आकर्षण असलेली नागद्वार यात्रा पुढच्या महिन्यात सुरू होत आहे. नागद्वारमध्ये गोविंदगिरी पहाडावर मुख्य गुहेत शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे जातात. नागमोडी वळणातून नागद्वारची कठीण यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष दूर होतो, अशीही भाविकांची श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यामुळे श्रावणात या यात्रेला भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. एसटी महामंडळाने नागद्वार यात्रेचे नियोजन केले आहे.
Powered By Sangraha 9.0