शिक्षण हे विद्यार्थ्याला आत्मनिर्भर करते

    दिनांक :02-Jul-2024
Total Views |
- प्रा. गजेंद्र आसुटकर यांचे प्रतिपादन
- गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

चंद्रपूर, 
अहल्यादेवी होळकर यांनी त्या काळातही शिक्षणाला फार महत्व दिले होते. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगावे. आपल्या शिक्षणामुळे देशाला, समाजाला काय फायदा होणार, याचासुद्धा विचार विद्यार्थ्याने करावा. शिक्षणामुळे विद्यार्थ्याला आत्मनिर्भर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य Gajendra Asutkar गजेद्र आसूटकर यांनी केले.
 
 
samman
 
Gajendra Asutkar : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीतर्फे सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. उद्घाटन सरदार पटेल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली हस्तक यांच्या हस्ते झाले. मंचावर समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, समितीचे मार्गदर्शक तुषार देवपुजारी, दाताळा ग्राम पंचायत सदस्य प्रतिभा काळे, पुष्पा गुलवाडे आदींची उपस्थिती होती.
 
 
Gajendra Asutkar : अंजली हस्तक यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुषार देवपुजारी यांनी, विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. पुष्पा गुलवाडे यांनी, विद्यार्थी जीवनात समाज कार्याची कास धरावी, असे आवाहन केले. तर डॉ. मंगेश गुलवाडे यांनी, समितीतर्फे विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणार्‍या वार्षिक कार्यक्रमाची माहिती दिली व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रातून काही प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात 10 वी, 12 वीच्या सर्व समाजातील 100 विद्यार्थ्याना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. संचालन खेमदेव कन्नमवार व सुनंदा कन्नमवार यांनी केले. वंदेमातरम् अदिती देव यांनी म्हटले. आभार महेश आस्कर यांनी मानले.