गोंदिया,
येथील साहित्यिक गोवर्धन बिसेन (गोकुल) यांच्या ‘मृदगंध’ या मराठी काव्यसंग्रहाला Vinda Karandikar Award विंदा करंदीकर शब्दशिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात हा पुरस्कार गोवर्धन बिसेन यांच्या कन्या डॉ.रिनल बिसेन यांनी स्विकारला.
शब्दशिल्प कलाविष्कार संघ, गिरजा महिला मंच महाराष्ट्र आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक सचिन गोखले यांनी केले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड व स्वागताध्यक्ष म्हणून शब्दशिल्प कलाविष्कार संघाच्या कार्याध्यक्षा हिरकणी वाणी उपस्थित होते. या संमेलनात गोंदियाचे साहित्यिक इंजि. गोवर्धन बिसेन यांच्या ‘मृदगंध’ या मराठी काव्यसंग्रहाला विंदा करंदीकर शब्दशिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवर्धन बिसेन मृद व जलसंधारण विभागात उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
Vinda Karandikar Award अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाच्या साहित्य समितीचे ते अध्यक्षही आहेत. गोवर्धन बिसेन यांचा पोवारी बोलीतील ‘मयरी’ कवितासंग्रह, ‘पुरखाइनको गौरवशाली इतिहास’ (इतिहास, संस्मरण आणि लघुकथा) हा लेख संग्रह आणि मराठी भाषेतील ‘मृदगंध’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. याशिवाय पोवारी, मराठी आणि हिंदी भाषेतील त्यांच्या अनेक कथा आणि कविता बहुभाषिक साहित्यिक व्यासपीठ ‘स्टोरीमिरर’, ‘अमर उजाला’, ‘शॉपीजन’ व ’प्रतिलिपी’ या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सुमारे 20 ते 25 काव्यसंग्रह, लेख संग्रह इत्यादी पोवारी, मराठी आणि हिंदी भाषेतील पुस्तके प्रकाशित झाली असून उत्कृष्ट लेखनासाठी त्यांना ‘पोवारी साहित्य रत्न’, ‘साहित्य कला कुमुदिनी रत्न’, ‘राष्ट्रीय साहित्यिकार’, ‘राष्ट्रीय प्रतिभा’, ‘साहित्यिक ब्रिगेडियर’ इत्यादी सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.