जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा प्राधान्याने विकास करा

20 Jul 2024 18:06:57
गडचिरोली, 20 जूलै
infrastructure in the district : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व मागास जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्ह्यातील काही भागात अजूनही पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही. ज्या ठिकाणी रस्ते, नाल्यासह पायाभूत सुविधा पूर्वी तयार झाल्या त्या आता मोडकडीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा प्राधान्याने विकास करा, अशी मागणी डॉ. सोनल कोवे यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
 
 
jjkh
  
 
त्यामध्ये त्यांनी प्रमुख चामोर्शी-भेंडाळा-हरणघाट महामार्ग दुरुस्ती करण, शाळेतील विद्यार्थ्यांकरीता राज्य परीवहन महामंडळाच्या नियमित बसेस चालू करण्यात याव्यात, जिल्ह्यातील काही गावात पिण्याकरीता पाण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मार्कंडा तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0