कळंब बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल

20 Jul 2024 19:53:10
कळंब, 
Kalamb bus stand : भगवान चिंतामणी येथे इंग्रजकालीन बसस्थानक असून अनेक दिवसांपासून येथे नव्या बसस्थानकाचे कामही सुरू आहे. येथे अनेक प्रवासी व बाहेरगावावरून कळंब येथे शिक्षणाकरिता येणारा मोठा विद्यार्थीवर्ग आहे. तेथे कोणतीही वेगळी व्यवस्था न केल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
y20July-Kalamb-Bus-Sthanak
 
Kalamb bus stand : विद्यार्थी व प्रवाशांच्या बसण्याची व पिण्याच्या पाण्याची काहीही व्यवस्था नसल्यामुळे सर्व विद्यार्थी व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बसस्थानक पूर्ण व्हायला अजून एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे एसटीने तातडीने बसस्थानकाच्या कामाकडे व प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता असून प्रवाशांची या जीवघेण्या त्रासातून सुटका कळंब स्थानक व महामंडळ करेल का, असा संतप्त प्रश्न हजारो प्रवासी व नागरिक विचारत आहेत.
Powered By Sangraha 9.0