शेगाव,
Shri's palanquin : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीसाठी गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी संस्थानच्या पंढरपूर शाखेतून आज, रविवारी पायदळ परतीच्या प्रवासाला निघाली.
13 जूनला श्रींची पालखी येथून वारकर्यांसह पंढरपूरकडे रवाना झाली होती. 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचली. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपल्यानंतर शनिवार, 20 जुलैपर्यंत पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी होती. ‘शेगावीचा राणा’ संत गजानन महाराज आपल्या वारकर्यांसह आज, रविवारी परतीच्या प्रवासाकरिता शेगावकडे निघाले.
पालखीचा परतीच्या प्रवासातील पहिला मुक्काम 21 जुलैला करकंब, 22 जुलै कुर्डूवाडी, 23 ला उपळाई स्टेशन, 24 ला भगवान बार्शी, 25 ला भूम, 26 ला चौसाळा येथे मुक्काम, 27 ला पाली, 28 ला बीड, 29 ला गेवराई, 30 ला शहापूर, 31 ला लालवाडी, 1 व 2 ऑगस्टला जालना, 3 ऑगस्ट सिंदखेडराजा, 4 ला बिबी, 5 ला लोणार, 6 ला मेहकर, 7 ला जानेफळ, 8 ला शिर्ला नेमाने, 9 ला आवार तर 10 ऑगस्टला खामगाव येथे पालखीचा मुक्काम राहील. 11 रोजी पालखी शेगाव येथे दाखल होणार आहे.
आज, रविवारी आषाढ शु. 15 ला श्रींचा पालखी सोहळा पहाटे 3 वाजता काल्याच्या कीर्तनाकरिता गोपाळ पुरी येथे मार्गस्थ झाला. त्यानंतर सकाळी 8 वाजता श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली.