कोलकाता,
बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रन्ण्टियरने हिंसाचारग्र बांगलादेशातून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत-बांगलादेश सीमेवर एकात्मिक चेक पोस्ट (आयसीपी) येथे ‘विशेष मदत केंद्र’ स्थापित केले आहेत. BSF's 'Special Help Center' बीएसएफचे जवान रात्रीच्या वेळीसुद्धा विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सक्रिय असून, त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी बांगलादेश सीमा सुरक्षेच्या (बीएसबी) संपर्कात आहो, असे अधिकारी म्हणाले.
बीएसएफने आतापर्यंत 572 भारतीय विद्यार्थी, 133 नेपाळी विद्यार्थी व भूतानच्या चार लोकांना परत आणण्यात यशस्वीपणे मदत केली आहे, असे सीमा रक्षक दलाने एका निवेदनात म्हटले आहे. या अशांततेच्या काळात बांगलादेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या अनेक भारतीय, नेपाळी व भूतानच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रन्ण्टियरने आयसीपी पेट्रापोल, एलसीएस गेडे, घोजाडांगा आणि महादीपूर येथे विशेष मदत कक्ष स्थापन केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीची सोय करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
BSF's 'Special Help Center' : बीएसएफ बीजीबीच्या सतत संपर्कात आहे. या समन्वयामुळे रात्रीच्या कामकाजातही विद्यार्थ्यांचे सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित झाले आहे. प्रक्रियेची कार्यक्षमता आणखी वाढवण्यासाठी आयसीपी पेट्रापोल येथील विशेष मदत केंद्र आता चोवीस तास खुले राहील, असे बीएसएफचे डीआयजी ए. के. आर्य म्हणाले. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वादग्रस्त नोकरी आरक्षण प्रणाली रद्द करण्यात यावी, अशा मागणीसाठी बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले असून या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे.