- उबाठा शिवसेनेचे सरसकट विम्यासाठी आंदोलन
यवतमाळ,
Crop insurance : तीन लाख शेतकर्यांचा विमा अजून मिळालेला नाही, सरसकट शेतकर्यांना विमा देण्यात यावा ही उबाठा शिवसेनेची मागणी आहे. त्याचा पाठपुरावा सतत शिवसेनेकडून होत आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा कृषी कार्यालयावर जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे व प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात धडक देण्यात आली. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी पीकविमा कंपनीची याचिका फेटाळल्यानंतरसुद्धा पीकविमा कंपनीने शेतकर्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही. त्याकरिता संबंधित पीकविमा कंपनीवर शेतकर्याची फसवणूक केल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी उबाठा शिवसेनेने केली आहे.
आयुक्तांनी कंपनीची याचिका फेटाळल्यानंतर पीकविमा कंपनीने मंत्रालयात सचिवाकडे याचिका दाखल केली होती. तिथेसुद्धा आयुक्तांचा निर्णय कायम ठेवण्यात आला असे जिल्हा कृषी कार्यालयात सांगण्यात आले. संबंधित निर्णयाच्या प्रोसिडिंगची प्रत आल्यानंतर शेतकर्यांच्या हातात पीकविम्याची रक्कम मिळेपर्यंत समोरील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आले.
Crop insurance : याप्रसंगी पवन जयस्वाल, महिला जिल्हा संघटक कल्पना दरवई, शहरप्रमुख चेतन सिरसाठ, अतुल गुल्हाने, विनोद पवार, जिल्हा सचिव तुषार देशमुख, भाई अमन, नितीन माकोडे, जितेश नवाडे, राजेश मांडवकर, रवी पांडे, रंगराव काळे, सचिन बारस्कर, राजेंद्र कोहरे, डॉ. गणेश नाईक, राजू धोटे, चंद्रकांत उडाके, शैलेश तांबे, अजय गाडगे, पंकज देशमुख, संतोष चव्हाण, मतीन तमन्ना, शंकर देऊळकर, हरीश गुरुवाणी, संजय भोने, हेमंत उगले, इमरान पठाण, विनोद काकडे, संजय राठोड, दिनकर भवरे, गणेश आगरे, गजानन पाटील, किशोर केवटे, अक्षय ठाकरे, राजू राऊत, मंदा गुडदे, नंदा देवगडे, प्रतिभा हरणखेडे, सुनीता टाके, वैशाली कनाके, संगीता राऊत, प्रभाकर बहादुरे, रामकृष्ण घरडे, क्षितिज ठाकरे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.