युवकांनी श्रमदानातून नदी पात्राची केली साफसफाई

23 Jul 2024 20:15:30
तभा वृत्तसेवा
सिंदीरेल्वे, 
river bed cleaning : पावसाळ्यात विविध पर्ण जन्य वनस्पतींचा विळखा नंदा नदीच्या दोन्ही पात्रांना बसला होता. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दिवसभर श्रमदान करुन नदीच्या पात्रांची साफसफाई केली.
 
 
jjih
 
नदीचे पात्र खोल करण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु, बेशरम सारख्या वनस्पती अमाप वाढल्या होत्या. पुराचे पाणी थेट नदीत पात्रातून जाण्यात अडचण येत होती. पुराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरण्याचा धोका लक्षात घेता भाजयुमोच्या युवकांनी गणेश काळबांडेच्या नेतृत्वात तीनशे मीटर नदीच्या दोन्ही काठावरील वनस्पती आणि बारिकसारिक झाडे तोडून परिसर स्वच्छ केला.
 
 
या अभियानात अमोल गवळी, दीपक पंधराम, अविनाश गवळी, विशाल सोनटक्के आणि मित्र मंडळीचे सहकार्य लाभले होते. शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी युवकांच्या कार्याची स्तुती केली आहे.
Powered By Sangraha 9.0