तलवार घेऊन फिरणार्‍या युवकाला घेतले ताब्यात

23 Jul 2024 20:36:20
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
carrying a sword : येथील लोहारा परिसरातील नेताजीनगरमध्ये तलवार घेऊन फिरणार्‍या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, 23 जुलै रोजी ताब्यात घेतले.
 

y23July-Talwar 
 
 
लोहारा परिसरात स्थागुशा पथक गस्त करीत असताना नेताजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक युवक तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने युवकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. त्याने अक्षय बलवंते (वय 23, नेताजीनगर) असे नाव सांगितले.
 
 
संशयित अक्षयकडून एक लोखंडी स्टीलची तलवार किंमत अंदाजे 1000 रुपये ताब्यात घेऊन त्याच्यावर शस्त्र अधिनियमनुसार कारवाई करून लोहारा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात अमोल मुडे, सय्यद साजिद, बंडू डांगे, अजय डोळे, रूपेश पाली, ऋतुराज मेडवे, निलेेश राठोड, योगेश टेकाम यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0