लोकमान्य टिळक यांची जयंती संपन्न

    दिनांक :23-Jul-2024
Total Views |
भंडारा,
स्थानिक यशवंतरावlokmanya tilak birthanniversary चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लाखांदूर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी एम.ठाकरे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.राकेश तलमले, प्रा.कांतीलाल लाडे, प्रा.डॉ.हरिश्चंद्र बोरकर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असंतोषाचे जनक म्हटले जाते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात ते अग्रणी होते.ब्रिटिश सत्ता हा ईश्वरी अंश आहे व उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे, हीच उत्तम नीती होय ही नेमस्त भूमिका सोडून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य, हा लोकमान्यांचा संकल्प होता. केसरी व मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले.

lokmanya 
बाळ गंगाधरlokmanya tilak birthanniversary टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात.भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जहाल विचारसरणीचे एक बंडखोर नेते होते.टिळकांनी जातीव्यवस्था, बालविवाह, सतीप्रथा इत्यादींविरुद्ध लोकांना जागृत केले. याशिवाय त्यांनी विधवा विवाहचे समर्थन देखील केले. ब्रिटिश प्रशासनाला विरोध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकजमाव आणि हे उत्सवाच्या माध्यमातून होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती ला सामूहिक उपक्रम बनविले. परंतु आज उत्सव साजरे करणे ही एक फॅशन झाली आहे, हे समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. असे विचार मान्यवरांनी विचारमंचावरून बोलताना व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ एच. जी.बोरकर यांनी केले तसेच संचालन प्रा. भोजराज बोदेले आणि आभार प्रा.डॉ. रिता राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.