आ. डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नांतून मिळणार शेतकर्‍यांना पीकविम्याचे पैसे

27 Jul 2024 19:45:53
बाभुळगाव, 
Ashok Uike : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील, शेतमालांचे क्लेम रिलायन्स कंपनीकडून डावलण्यात आले होते. त्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून वंचित असलेल्या 1 लाख 98 हजार 532 शेतकर्‍यांना 43 कोटी 62 लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी राळेगाव विधानसभेचे आमदार डॉ. अशोक उईके यांच्या विशेष प्रयत्नांतून मंत्रालयात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी रिलायन्स पीकविमा राज्यप्रमुख रोहन पाटील, वरिष्ठ कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनातील महसूल व कृषी अधिकारी उपस्थित होते.
 
 
y27July-Ashok-Uike
 
Ashok Uike : शेतीपिकांचे नुकसान होऊन दावा करूनही रिलायन्स पीकविमा कंपनीकडून दावे नाकारण्यात आले होते. हे दावे गृहित धरण्यात यावे यासाठी वेळोवेळी तांत्रिक बाबीसाठी आ. डॉ. अशोक उईके यांनी समन्वय ठेवून शेतकरी हितासाठी या विषयाचा अविरत पाठपुरावा केला होता. तातडीने ही बैठक घेण्यात यावी यासाठी उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष यात घातले होते. गेल्या खरीप हंगामातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील पीकविमा भरपाईचा विषय शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन मार्गी लावला. पीकविमा रक्कम येत्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. आमदार डॉ. अशोक उईके प्रामाणिकपणे या पीकविमा संबंधात प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राळेगाव विधानसभेतील शेतकर्‍यांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
Powered By Sangraha 9.0