गडचिरोली,
Commando-C60-Naxal नक्षली चळवळीतील हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून तसेच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत एका वरिष्ठ जहाल महिला माओवाद्याने आज गडचिरोली पोलिस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. Commando-C60-Naxal रिना बोर्रा नरोटे उर्फ उलीता (36) रा. बोफनफुंडी ता. भामरागड असे आत्मसमर्पित महिला नक्षलवद्याचे नाव आहे. रिना नरोटे ही सन 2006 पेरमिली दलममध्ये भरती झाली. 2007 पासून सप्लाय टिम सदस्य म्हणून कामाला सुरुवात. 2007-08 मध्ये शिवणकला, कापड कटींग व शिलाई मशीन चालविण्याचे प्रशिक्षण घेतली. Commando-C60-Naxal 2008 ते 2014 पर्यंत टेलरिंग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. त्यानंतर टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यंत कार्यरत. तिचा 1 चकमक व 1 खुनाच्या गुन्ह्यात सहभाग होता. Commando-C60-Naxal सन 2020 मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेली चकमक व 2019 मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग होता.
चळवळीतील वरिष्ठ कॅडरचे माआवादी चळवळीकरीता पैसे गोळा करण्यास सांगतात, गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. स्त्रियांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. Commando-C60-Naxal वरिष्ठ नक्षली फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करतात. विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. सततच्या अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. पोलिस दलाच्या आक्रमण माओवादविरोधी अभियान तसेच दलममधील सदस्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पण केल्याचे त्यानी सांगीतले. महाराष्ट्र शासनाने रिना नरोटे हिच्यावर 8 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व रज्य शासनाकडून तिला एकूण 5.5 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. Commando-C60-Naxal गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
Commando-C60-Naxal सदर कारवाई नागपूरचे पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन 09 चे कमांडंट शुभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. विकासकामांना आडकाठी निर्माण करणार्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल.Commando-C60-Naxal त्यामुळे माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.