मध्य गाझातील शाळेवर इस्रायलचा हल्ला, 30 ठार

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
- 100 पेक्षा जास्त जखमी
 
दीर, 
Israel's attack : मध्य गाझातील दीर अल-बलाह येथे एका शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान 30 जण ठार, तर 100 पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकार्‍यांनी दिली. हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला, असा दावा इस्रायलच्या सैन्याने केला. या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या 30 असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने तसेच हमासच्या माध्यम कार्यालयाने दिली. गाझातील विस्थापित कुुटंबांची सर्वाधिक सं‘या असलेल्या क्षेत्रांपैकी हे एक आहे. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
 
 
Israel's attack
 
Israel's attack : मध्य गाझातील खदीजा शाळेच्या परिसरातील हमासच्या नियंत्रण केंद्रावर हा हल्ला करण्यात आला. शाळेचा वापर इस्रायलच्या सैनिकांवर हल्ला करण्यासाठी तसेच शस्त्रास्त्रे जमा करण्यासाठी केला जायचा. हल्ल्यापूर्वी नागरिकांना इशारा देण्यात आला होता, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. जखमींना दीर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमी पायीच रुग्णालयात पोहोचले. त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. नागरिकांना समोर करून हमास हल्ले करीत असल्याचा आरोप यापूर्व इस्रायलच्या सैन्याने केला होता.