नवी दिल्ली,
explosion of electric bike battery इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीला आग लागल्याच्या बातम्या आणि व्हिडिओ आम्ही पाहतो आणि ऐकतो. नुकताच अशाच एका घटनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती लिफ्टमध्ये बॅटरी घेऊन जात होता. त्यानंतर अचानक बॅटरीचा स्फोट झाला आणि काही वेळातच लिफ्टने पेट घेतला. लिफ्टच्या आतल्या ज्वालांनी त्या व्यक्तीला वेढले.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प गोळी प्रकरणी...एफबीआयचा खुलासा,म्हणाले...
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. लिफ्टचे गेट बंद होताच, बॅटरीचा स्फोट होतो आणि लिफ्टच्या आत आग लागते. ती व्यक्ती सर्व बाजूंनी आगेनी वेढलेली असते आणि आगीत जळून जाते.
explosion of electric bike battery व्हिडिओमध्ये काही वेळानंतर जेव्हा रेस्क्यू टीम आली तेव्हा त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडून त्या व्यक्तीला बाहेर काढले. ती व्यक्ती बाहेर आल्यावर आगीत भस्मसात झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा : धक्कादायक...तिहार तुरुंगात 125 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह