अर्थव्यवस्था मजबुतीसाठी मालदीवने मानले भारताचे आभार

    दिनांक :28-Jul-2024
Total Views |
- स्वातंत्र्य दिन सोहळ्यात राष्ट्राध्यक्षांचे गौरवोद्गार
 
बीजिंग/माले, 
मालदीव सध्या आर्थिक संकटात आहे. देशाच्या कर्जाच्या संकटावर आणि भविष्यातील विकासाला तोंड देण्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष Mohamed Muizzoo मोहम्मद मुईझ्झू यांनी भारत आणि चीनचे महत्त्व अधोरेखित केले तसेच मालदीवच्या नाजूक अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी दोन्ही देशांचे आभार मानले. देशाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चीन आणि भारत सर्वाधिक मदत करतात, असे राष्ट्राध्यक्ष मुईझ्झू यांनी शुक‘वारी देशाच्या स्वातंत्र्याच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक‘मात सांगितले.
 
 
Mohamed Muizzoo
 
Mohamed Muizzoo मुईझ्झू म्हणाले की, मालदीवच्या लोकांच्या वतीने मी चीन सरकार आणि भारत सरकारचे अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक सार्वभौमत्व राखल्याबद्दल आभार मानतो. भारतविरोधी मोहिमेमुळे मुईझ्झू गेल्या वर्षी मालदीवमध्ये सत्तेवर आले होते. भारताने दिलेले हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने चालवणारे सुमारे 80 भारतीय लष्करी कर्मचारी काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली होती. तथापि, आता मालदीवने डॉर्नियर विमाने आणि दोन हेलिकॉप्टरचा वैद्यकीय निर्वासन सेवा पुन्हा सुरू केला आहे आणि यासाठी भारताचे आभारही मानले आहेत.
 
 
चीनने आपल्या बाजूने मालदीवशी संबंध वाढवले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी चीनला भेट दिली होती. या कालावधीत दोन्ही देशांनी आपले संबंध धोरणात्मक सहकारी भागीदारीच्या पातळीवर आणले आणि 20 करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. यानंतर बीजिंगसोबत लष्करी मदतीचा करार करण्यात आला. मोईझ्झू यांनी भारताने दिलेल्या 400 कोटी रुपयांच्या मदतीचेही कौतुक केले.