नवी दिल्ली,
Rishabh Pant सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमानांचा 43 धावांनी पराभव केला. पल्लेकेलेमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांत गडगडला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 58 धावांची खेळी केली.
हेही वाचा :आज क्रिकेटचा डबल डोस, भारत आणि श्रीलंका संघ दिवसातून दोनदा भिडणार
त्याच्याशिवाय टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही 49 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. या काळात पंतने सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वास्तविक, टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यात 49 धावांची खेळी केली आणि यष्टीरक्षक म्हणून तो भारतासाठी श्रीलंकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यादरम्यान पंतने 2018 मध्ये बनवलेला दिनेश कार्तिकचा 6 वर्ष जुना विक्रम मोडला. एक भारतीय यष्टीरक्षक म्हणून, एमएस धोनीने 2012 मध्ये श्रीलंकेत T20I मध्ये 23 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
Rishabh Pant 49 धावांची इनिंग खेळून पंत पहिल्यांदाच T20I मध्ये बाद झाला. अशा प्रकारे तो 49 धावांवर बाद झालेल्या महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला. पंतच्या आधी, विराट कोहली, एमएस धोनी, रुतुराज गायकवाड टी-20 मध्ये भारतासाठी 49 धावांवर बाद झाले होते. याशिवाय पंतने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये आपल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील 100 वा फलंदाज ठरला.
हेही वाचा : दादागिरी...डीलरने मुलीला फेकले छतावरून, VIDEO