जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक स्नेहल भाकरे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

28 Jul 2024 18:52:36
नेर, 
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व शिवसेना उबाठा गटाचे दिग्रस विधानसभा सहसंपर्कप्रमुख Snehal Bhakere स्नेहल भाकरे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तालुक्यात शिवसेनेच्या उबाठा गटामधील कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट अनेक दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर व कार्य तत्पर्तेवर विश्वास ठेवून जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेना उबाठा गटाचे दिग्रस विधानसभा सहसंपर्कप्रमुख स्नेहल भाकरे यांनी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
 
 
y28July-Snehal-Bhakare
 
Snehal Bhakere : या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांना सन्मान व उचित न्याय मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री संजय राठोड यांनी स्नेहल भाकरे व त्यांच्या सहकार यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन केले. आपण पालकमंत्री संजय राठोड यांच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे याप्रसंगी स्नेहल भाकरे यांनी सांगितले. शिवसेनेत प्रवेश घेणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बाबाराव राठोड, अनिल चव्हाण, शेख मुस्ताक, नितीन बोकडे, तेजस काळे, हरिश्चंद्र रूपवणे, विठ्ठल राव शिंगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल सोळंके, निरंजन लांजेवार इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक तथा शिवसेना सह संपर्कप्रमुख राजुदास जाधव, मोहन राठोड, प्रवीण राठोड, प्रशांत मासाळ, गजानन भोकरे उपस्थित होते. कार्यक‘माचे संचालन व आभारप्रदर्शन राजूदास जाधव यांनी केले.
Powered By Sangraha 9.0