- भागवत देवसरकर यांच्या पाठपुराव्याला यश
हदगाव,
Swami Dutt Temple - Pimpalgaon जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिद्ध देवस्थान शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी श्रीदत्त मंदिर संस्थान पिंपळगाव या देवस्थानाला राज्य सरकारने ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला आहे. याबाबत राज्याचे ग‘ामविकास मंत्री, तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी सतत पाठपुरावा करत ब दर्जा मंजूर करून घेतल्याचे सांगितले.
Swami Dutt Temple - Pimpalgaon : ब दर्जा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मंदिराचा, परिसराचा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार आहे. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात मंदिरात येणार्या भाविकांना सुख-सुविधा मिळणार आहेत. राज्य सरकारचे व ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे परिसरातील भाविकांच्या व नागरिकांच्या वतीने भागवत देवसरकर यांनी आभार मानले.