मोठी अपडेट...भारतात व्हॉट्स अ‍ॅप बंद होणार?

Whatsapp-Ashwini Vaishnaw केंद्रीय मंत्र्यांनी दिली ही माहिती

    दिनांक :28-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली,
 
 
Whatsapp-Ashwini Vaishnaw गेल्या काही वर्षांत विशेषत: कोरोनाकाळात, भारतीय नागरिक सोशल मिडीयावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह झाले. त्यातून, परस्परांशी संवाद साधण्यासोबतच लहानमोठे व्यवसाय, मनोरंजनातून उत्पन्नाचे साधन आणि हौशीसाठी व्हॉट्स अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. Whatsapp-Ashwini Vaishnaw पण, गेल्या महिन्याभरापासून व्हॉट्स अ‍ॅप भारतात बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा विषय संसदेतही चर्चेला आला आणि सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. केंद्रीय मंत्र्यांनी याविषयी सभेत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
 

Whatsapp-Ashwini Vaishnaw 
 
 
Whatsapp-Ashwini Vaishnaw भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत या विषयावर माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी सभेपुढे हा प्रश्न उपस्थित करताना विचारले की, सरकारने व्हॉट्स अ‍ॅप युझर्सचा डेटा मागितल्यामुळे, कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे का? त्यावर, वैष्णव यांनी सांगितले की, स्वत: व्हॉट्स अ‍ॅप किंवा  त्याची पॅरेंट कंपनी मेटाने याविषयी सरकारला काहीही माहिती दिलेली नाही. Whatsapp-Ashwini Vaishnaw या वर्षाच्या सुरुवातीला एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, व्हॉट्स अ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं की, युझर्सच्या मेसेजेसचे इन्क्रिप्शन तोडण्यासाठी जर त्यांच्यावर दबाव येणार असेल तर, कंपनी भारतातून आपले सेवा बंद करेल.
 
 
 
या सोशल मिडीया अ‍ॅपचा वापर करून, फेक न्यूज पसरविण्यासह सायबर क्राईमसाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर वाढत असल्यामुळे, डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती. Whatsapp-Ashwini Vaishnaw शिवाय, समाजात असंतोष निर्माण करण्यासह असामाजिक तत्त्वांच्या एकत्रीकरणासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. दरम्यान, मेटा कंपनीनेही युझर्समध्ये जागरुकता आणण्यासाठी अनेक वेळा कँपेनिंग केले आहे.